मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गाईला त्रास देणाऱ्या तरुणाला घडली चांगलीच अद्दल, Video पाहून म्हणाल, ''याला म्हणतात कर्माचं फळ''

गाईला त्रास देणाऱ्या तरुणाला घडली चांगलीच अद्दल, Video पाहून म्हणाल, ''याला म्हणतात कर्माचं फळ''

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला या तरुणावर दया तर येईलच, परंतू त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमचं हसू देखील आवरणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 2 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे व्हिडीओ आणि ज्ञानाचा भंडार आहे. म्हणून तर तुम्ही एकदा का इथे आलात, तर तुमचा तासनतास वेळ कसा निघून जाईल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. येथे तुम्हाल अनेक मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतील. सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला एक म्हण नक्की आठवेल.... ती म्हणजे 'जैसे कर्म तैसे फळ'

म्हणजेच काय, तर तुम्ही जे काही चांगली-वाईट गोष्ट कराल, त्याची परतफेड तुम्हाला याच जन्मात मिळतात. सोशल मीडियावरील व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून लोकांना देखील याचीच आठवण झाली.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला या तरुणावर दया तर येईलच, परंतू त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमचं हसू देखील आवरणार नाही.

हे ही पाहा : King Cobra शी खेळ करणं त्याच्या जीवावर बेतलं, Kiss करायला तोंड पुढे नेलं आणि... पाहा Video

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये खूप गाई आहेत. ज्यांना एका गेटच्या आत बंद केलं गेलं आहे. तेव्हा एक तरुण भिंतीवरुन चढतो आणि जवळ असलेल्या गाईला लाथ मारण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात ती गाय देखील आपले मागील दोन पाय उचलते आणि या तरुणाला लाथ मारते. ज्यामुळे यातरुणाचा बॅलेंस जातो आणि तो पाठीमागे पडतो.

खरंतर लोकांना त्यांच्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात असं म्हणत असले तरी देखील या तरुणाच्या कर्माची शिक्षा त्याला त्याच क्षणी मिळाली.

तरुणाला मिळालेली शिक्षा पाहाता लोकांना आपलं हसू आवरता येत नाहीय, परंतू नक्कीच या तरुणाला जोरदार मार बसला असावा.

हे ही पाहा : उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्... VIDEO VIRAL

खरंतर कुणालाही विनाकारण त्रास देऊ नये. मग माणूस असो वा वन्य प्राणी, विनाकारण त्रास देणे नेहमीच समस्या निर्माण करते.

@Unexpectedvid_1 नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोकांचे जोरदार लाईक आणि शेअर आले आहेत. तसेच लोक या व्हिडीओवर कमेंट करायला विसरले नाहीत. एका युजरने लिहिले की, "कोणताही अर्थ नसताना कोणाला त्रास देणाऱ्यांसोबत असंच व्हायला हवं." दुसरीकडे, आणखी एका युजरने लिहिले आहे की, ''जे लोक असे करतात ते इतके फालतू आहेत, त्यांना असे करून काय मिळते ते माहित नाही.''

First published:

Tags: Shocking viral video, Social media, Top trending, Viral news