जाहिरात
मराठी बातम्या / Viral / उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्... VIDEO VIRAL

उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्... VIDEO VIRAL

जोडप्यासोबत घडली अप्रिय घटना

जोडप्यासोबत घडली अप्रिय घटना

लग्न आणि प्रेम ही प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्वाची आणि जवळची गोष्ट आहे. पण नात्याच्या सुरुवातीलाच काही विचित्र घटना घडली तर, समोरील व्यक्तीचं काय होत असेल, हे तर त्या व्यक्तीलाच ठावूक

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 2 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच असे काही व्हिडीओ येत असतात, जे कधी मनोरंजक असतात, तर कधी फारच धक्कादायक. येथे आपल्याला काही व्हिडीओ असे देखील पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील बऱ्याचदा अशक्य होतं. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. खरंतर लग्न आणि प्रेम ही प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्वाची आणि जवळची गोष्ट आहे. पण नात्याच्या सुरुवातीलाच काही विचित्र घटना घडली तर, समोरील व्यक्तीचं काय होत असेल, हे तर त्या व्यक्तीलाच माहीत. हे वाचा : अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO नक्की काय घडलं? खरंतर एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी एक सुंदर ठिकाण निवडतो. उंच डोंगरावर, आजूबाजूला घनदाट झाडी आणि वाहाता धबधबा. अशा ठिकाणी हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडला बोलावतो आणि हातात अंगठीचा बॉक्स घेऊन प्रपोज करण्यासाठी खाली गुडघ्यावर बसतो. पण खाली बसत असताना, त्याचा तोल गेला आणि त्याच्या हातातील अंगठी, त्या डब्यासह डोंगरावरुन खाली पडते. ही घटना त्याच्याजवळील एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली.

जाहिरात

या घटनेनंतर तरुण आणि तरुणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहाण्यासारखे आहेत. खरंतर नात्याची सुरुवात करण्यापूर्वीच त्यांच्यासोबत असा प्रकार घडला आहे, ज्यामुळे दोघांनाही खूरच वाईट वाटलं. हे वाचा : भरधाव वेगाने बाईक घेऊन आलेल्या चोरांना, गार्डने घडवली अद्दल; पाहा धक्कादायक Video आता या पुढे या जोडप्यानं काय केलं किंवा त्याच्यासोबत काय घडलं? याबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तो भलताच व्हायरल झाला आहे. लोकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर लोकांनी यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात