मराठी बातम्या /बातम्या /Viral /

King Cobra शी खेळ करणं त्याच्या जीवावर बेतलं, Kiss करायला तोंड पुढे नेलं आणि... पाहा Video

King Cobra शी खेळ करणं त्याच्या जीवावर बेतलं, Kiss करायला तोंड पुढे नेलं आणि... पाहा Video

किंग कोब्रा

किंग कोब्रा

जिथे लोक साप पाहून लांब पळतात, तिथे या तरुणाने आपल्या हातात सापाला पकडलं आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, हा काही साधा साप नाही तर तो चक्कं किंग कोब्रा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 2 ऑक्टोबर : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग त्यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील पाहिले असतील. हे व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या समोर आलेला व्हायरल व्हिडीओ देखील असाच आहे.

हा व्हिडीओ किंग कोब्राशी संबंधीत आहे. ज्यामध्ये तरुणाच्या अती शहाणपणामुळे जीवाशी खेळ झाला आहे.

जिथे लोक साप पाहून लांब पळतात, तिथे या तरुणाने आपल्या हातात सापाला पकडलं आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, हा काही साधा साप नाही तर तो चक्कं किंग कोब्रा आहे.

हे ही पाहा : भरधाव वेगाने बाईक घेऊन आलेल्या चोरांना, गार्डने घडवली अद्दल; पाहा धक्कादायक Video

किंग कोब्रा हा इतका विषारी असतो की, त्याच्या दंशानंतर माणसाचा जीव वाचणं, हे जवळ-जवळ अशक्यच आहे. असं असून देखील हा तरुण आपल्या हातात या किंग कोब्राला घेतो आणि आपल्या गुडघ्यांवर खाली बसतो.

हा तरुण त्या सापाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करणार असतो. हा तरुण सापाजवळ आपलं तोंड नेतो, परंतू पापणी लवते न लवते, तोच सापाने त्याच्या ओठांवर दंश केला. ज्यानंतर घाबरुन या तरुणानं त्या किंग कोब्राला सोडून देलं.

View this post on Instagram

हे सगळं इतक्या कमी वेळात घडलं की, या तरुणाला आपलं तोंड मागे घेण्याचा वेळ देखील मिळाला नाही. हा व्हिडीओ कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील बोम्मनकट्टे येथील असल्याचं समोर आलं आहे.

हे ही पाहा : उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्... VIDEO VIRAL

हा तरुण सर्पप्रेमी असल्याची माहिती मिळत आहे. परंतू आता या तरुणाची स्थिती कशी आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

हा व्हिडीओ शेअर होताच, तो जोरदार व्हायरल झाला आहे. लोकांनी त्याला भरभरुन कमेंट आणि शेअर देखील केलं आहे.

First published:

Tags: King cobra, Shocking viral video, Top trending