मुंबई, 08 फेब्रुवारी : सोशल मीडियावर नेहमीच असे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे खूपच मनोरंजक असतात. ज्यामुळे असे व्हिडीओ पाहण्यात आपला वेळ कसा निघून जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. येथे प्राण्यांपासून ते माणसं आणि अगदी लहान मुलांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video हा व्हिडीओ बिबट्याशी संबंधीत आहे. ऐरवी नुसतं बिबट्याचं नाव जरी घेतलं तरी अंगावर येतो, पण आज मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच या बिबट्याला बिचारा म्हणावंस वाटेल. शिवाय हा व्हिडीओ मजेदार आहे. नदीमध्ये पाणी प्यायला गेलेल्या बिबट्याच्या हाती त्याची शेपटी लागले आणि त्याला ही शेपटी शिकार असल्याचं वाटते. त्यामुळे हा बिबट्या आपल्याच शेपटीला पकडण्याच्या प्रयत्नात असतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बिबट्या नदीत पाणी पित असताना दिसेल, पुढे तो काहीतरी शोधत आहे असे भासतो आणि मग तो त्या गोष्टीचा शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्या स्वत:च्या शेपटीलाच आपलं शिकार बनवतो.
अखेर हा बिबट्या आपली शेपटी तोंडात पकडून पाण्याबाहेर पडतो आणि जमीनीवर जाऊन पुन्हा स्वत:च्या शेपटीशी खेळू लागतो. बिबट्याचं असं वागणं पाहून त्याला बिचारा बिबट्या असंच म्हणावंस तुम्हाला वाटेल.
जंगलाशी संबंधित हा व्हिडीओ waowafrica नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स देखील केलं आहे.