मुंबई 29 डिसेंबर : जंगलातील काही मांसाहारी प्राणी हे फारच धोकादायक असतात. त्यांच्या तावडीत जर कोणी अडकलं तर मग संपलंच. त्यांच्या हातातील शिकार सुटणं फारच अवघड आहे. पण असं असलं तरी शिकार करणं हे काही सोपं काम नाही. विशेष करुन जेव्हा शिकार हा वजनाने शिकारीपेक्षा मोठा असेल तेव्हा.
जंगलातील मांसाहारी प्राणी हे एकाच प्रकारच्या प्राण्यांचा शिकार करत नाहीत, तर ते वेगवेगळ्या प्राणांना टार्गेट करतात. त्यामुळे प्रत्येक शिकाराला आपल्या जाळात अडकवण्यासाठी त्यांना वेगळी मेहनत घ्यावी लागते.
हे ही पाहा : अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं, संपूर्ण Video पाहून बसेल धक्का
पण यासगळ्यात कधीकधी शिकाऱ्याला आपले प्राण देखील गमवावे लागते, तर काही वेळा शिकारी गंभीर जखमी देखील होतो.
याच संबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
हो कारण, या व्हिडीओमध्ये एक सिंहिण ही पाणघोड्याला टार्गेट करते. खरंतर शरीराने आणि ताकदीने इतक्या मोठ्या पाणघोड्याला आडवं करणं किंवा शिकार करणं कोणा एकट्याचं काम नाही, पण हीच चुक नेमकी ही सिंहिण करुन बसते आणि सगळंच फसतं.
जेव्हा सिंहिण पाणघोड्यावर अटॅक करते, तेव्हा गेंडा उलटा फिरतो आणि आपल्या मोठ्या जबड्यात तिचं तोंड पकडतो आणि तिला एकडे तिकडे झटकतो, ज्यामुळे सिंहिण जखमी होते. हा व्हिडीओ इथेच संपला आहे. यामध्ये पुढे नक्की काय होतं? किंवा ही सिंहिण जिवंत राहिला की नाही हे काही कळू शकलेलं नाही. तसेच हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही.
हा व्हिडीओ wildlifeanimall नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर लोकांनी भरभरुन कमेंट्स केलं आहेत. तसेच या व्हिडीओला एक हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि शेअर्स देखील मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Social media trends, Top trending, Videos viral, Viral, Wild life