जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जंगल सफारी दरम्यान व्यक्तीजवळ येऊन उभा राहिला सिंह, हा Video पाहून होईल रक्ताचं पाणी

जंगल सफारी दरम्यान व्यक्तीजवळ येऊन उभा राहिला सिंह, हा Video पाहून होईल रक्ताचं पाणी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

लोक सोशल मीडियावर याच संबंधीत व्हिडीओ देखील पाहाता. हे व्हिडीओ कधी क्यूट प्राण्यांचे तर कधी थरारक शिकारीचे असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 18 डिसेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे आपण एकदा का आलो की आपल्याला इतके व्हिडीओ पाहायला मिळतात की ते पाहण्यात वेळ कसा निघून जातो? हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सोशल मीडियावर अनेक मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे प्राण्यांशी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ समोर येतात. जगभरात प्राणी प्रेमींची कमी नाही त्यामुळे या संबंधीत व्हिडीओ पाहाणारे किंवा अपलोड करणाऱ्या लोकांची देखील कमी नाही. लोक सोशल मीडियावर याच संबंधीत व्हिडीओ देखील पाहाता. हे व्हिडीओ कधी क्यूट प्राण्यांचे तर कधी थरारक शिकारीचे असतात. हे ही पाहा : Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि… सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. हा व्हिडीओ खरोखरंच हृदयाचे ठोके चुकवणारा आहे. हा व्हिडीओ जंगल सफारी दरम्यानचा आहे. एक पर्यटक जंगलात येऊन जंगलातील प्राण्यांचा शोध घेत होता. पण त्याला कोणी दिसत नव्हते. त्या दरम्यान हळूच एक सिंह त्याच्या अगदी जवळ येऊन उभा राहातो. हा सिंह या व्यक्तीच्या इतक्या जवळ उभा आहे की तो कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवू शकतो.

खरंतर या व्हिडीओमधील व्यक्ती आधी प्राण्यांना शोधण्यासाठी दुर्बिनीचा वापर करते. तेव्हाच त्याच्या बाजूला सिंह येऊन उभा राहातो. हे ही पाहा : नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या हत्तीच्या समोर आली मगर आणि मग… पाहा Viral Video जेव्हा ही व्यक्ती आपल्या बाजूला पाहाते तेव्ही तिच्या लक्षात येते की तिच्या बाजूला सिंह बसलाय. ही व्यक्ती ते पाहून दचकते. विचार करा की जर असं तुमच्यासोबत घडलं तर काय होईल? अशावेळी कोणाच्याही रक्ताचं पाणी होईल. या व्हिडीओवर सोशल मीडियावर भरभरुन कमेंट्स आणि लाईक्स आल्या आहेत. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात