जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या हत्तीच्या समोर आली मगर आणि मग... पाहा Viral Video

नदीकाठी पाणी प्यायला आलेल्या हत्तीच्या समोर आली मगर आणि मग... पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

मगरीने वाघा सारख्या हिंस्र प्राण्याला ही आपलं भक्ष बनवलं असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ तुम्ही श्वास रोखून पाहाल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 10 डिसेंबर : हिंस्र प्राणी असोत किंवा मग शाकाहारी प्राणी. ते पाणी पिण्यासाठी नेमहीच तळ्याकाठी येत असतात. अशाच संधीचा फायदा घेत बऱ्याचदा मगर देखील त्यांच्यावर हल्ला करते आणि आपले पोट भरते. तसे पाहाता हे निसर्गाचं चक्र आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी पोट भरण्यासाठी एकमेकांची शिकार करत असतात. तुम्ही नदीकाठी अनेक प्राण्यांवर मगरीने हल्ला केल्याचं पाहिलंच असेल. बऱ्याचदा मगर यामध्ये यशस्वी देखील होते. इतकच काय तर मगरीने वाघा सारख्या हिंस्र प्राण्याला ही आपलं भक्ष बनवलं असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ तुम्ही श्वास रोखून पाहाल. हे ही पाहा : Video : जेव्हा मगरीचं कॉस्ट्यूम घालून तो खऱ्या मगरीजवळ येतो, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा यावेळी जो व्हिडीओ समोर आला आहे तो धक्कादायक आहे. हा व्हिडीओ मगर आणि हत्तीशी संबंधित आहे. यामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेला हत्ती आणि मगर या दोघांमध्ये काय घडलं? हे तुम्ही पाहू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हत्ती नदी किनारी पाणी प्यायला आले असल्याचे दिसत आहे. अशावेळी जेव्हा एक हत्ती पाणी प्यायला लागताच मगर त्याची सोंड धरते आणि इथेच चुक करुन बसते. यानंतर हत्ती लगेच संतापतो आणि मगरीवर तुटून पडतो. तो मगरीला सोंडेने पकडून इकडे तिकडे धरतो. तसेच तिच्यावर उभा देखील राहातो आणि पायाने चिरडण्याचा प्रयत्न करू लागतो. हा संपूर्ण प्रकार फारच धक्कादायक आहे.

    जंगल सफारी करायला गेलेल्या लोकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा संपूर्ण प्रकार टिपला आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार या मगरीचा मृत्यू झाला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तसे पाहाता हत्ती हा फार शांत प्राणी आहे, पण जेव्हा कोणी त्याच्या नादाला लागतं, तेव्हा तो कोणाचच ऐकत नाही. मग तो कोणी का असेना. हे त्याने पुन्हा एकदा या व्हिडीओमधून पटवून दिलेलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात