मुंबई 15 सप्टेंबर : तुम्ही केव्हाही सोशल मीडिया उघडा, तुमच्यासमोर वेगवेगळे आणि मनोरंजक व्हिडीओ येतात. जे पाहण्यात तुमच्या तासन तास कसा निघून जातो, हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. या व्हिडीओमध्ये कधी कॉमेडी, कधी क्राफ्ट, तर कधी लग्नाशी संबंधीत काही व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील दोघांच्या भांडणाचाच आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक मुंगूस झाडाखाली बसला आहे. तेव्हा त्याला झाडावर एक साप दिसला, ज्यानंतर त्याच्यावर अटॅक करण्यासाठी हा मुंगूस उडी मारतो आणि तोंडाच्या बाजूने हा मुंगूस सापाला पकडतो. ज्यानंतर या दोघांची मारामारी पाहायला मिळते. हे वाचा : जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video हा व्हिडीओ पाहून असे लक्षात येत आहे की, मुंगूस सापाला शिकार बनवण्यासाठी उत्सुक होता साप या हल्ल्याला अजिबात तयार नव्हता. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहा. उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला पोस्ट करताना, ‘प्राणी जितका लहान असेल तितका त्याचा आत्मा अधिक धैर्यवान असेल’ असं कॅप्शन देखील केलं गेलं आहे. हे वाचा : ‘स्कूल चले हम’ विद्यार्थी नाही तर चक्क वानरालाच लागली शिक्षणाची गोडी, पाहा Video हा व्हिडीओ पाहाताना आधी असंच दिसत आहे की, मुंगूस जिंकला आहे आणि सापाला तोंडात दाबून तेथून तो घेऊन गेला. परंतू नक्की पुढे काय घडलं असेल हे सांगता येणं कठीण आहे, कारण बऱ्याचदा सापाच्या विशामुळे मुंगूसाचे देखील प्राण गेले आहेत.
The smaller the creature, the bolder its spirit
— उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) (@wnashik_forest) September 8, 2020
Survival of the Fittest#wildearth #wildlife #greenscreen pic.twitter.com/wFLnGSRh3a
अवघ्या ४५ सेकंदांचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. ज्यावर अनेक वापरकर्ते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही वापरकर्त्यांनी सापाला गरीब म्हटले तर काहींनी मुंगूस धाडसी म्हटले आहे.