जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video

जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video

जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video

जिथे लोकांना लांबून जरी साप दिसला तरी ते जीवाच्या आकांताने पळ काढतात. परंतू इथे एक तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता चक्कं सापासमोर झोपत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 12 सप्टेंबर : इंटरनेटवर नेहमीच आपल्याला काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, हे व्हिडीओ कधी धोकादायक असतात, तर कधी फारच मनोरंजक असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुण प्रसिद्धीसाठी आपलं प्राण धोक्यात टाकत आहे. खरंतर आजची तरुण मंडळी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्ससाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. यासाठी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. या व्हायरल व्हिडीओत एक तरुण दिसत आहे. जो सापासमोर झोपला आहे. हो हे खरं आहे. जिथे लोकांना लांबून जरी साप दिसला तरी ते जीवाच्या आकांताने पळ काढतात. परंतू इथे एक तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता चक्कं सापासमोर झोपत आहे. हे वाचा : ती लग्नपत्रिका घेऊन प्रवास करणार, इतक्यात अधिकाऱ्यांनी तिला विमान तळावर थांबवलं; अखेर समोर आलं मोठ रहस्य Video व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस सापाला कसे चिडवतो आणि त्याच्यासमोर जमिनीवर झोपतो. साप सुद्धा खूप शांत स्वभावाचा वाटतो. सापामुळे त्या व्यक्तीला कोणतीही इजा झाली नाही. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हीही पाहावा. त्या व्यक्तीचे नशीब चांगले होते की सापाचा मूड चांगला होता, अन्यथा साप त्या तरुणाच्या इतक्या जवळून गेला की, त्याचा दंश केल्याशिवाय साप राहिला नसता, ज्यामुळे कदाचित त्या व्यक्तीचे प्राण देखील जाऊ शकले असते. जे खरोखरंच धक्कादायक आहेत.

जाहिरात

हे वाचा : वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला आणि मुलाला गमावून बसला, 24 तासात दोघांच्या मृत्यूने शिक्षक कोमात हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर world_of_snakes नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 10 तासांत हजारो लोकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. तसेच याच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात