मुंबई, 08 जुलै : टीव्हीवर वन्यजीवांवर आधारित अनेक कार्यक्रम पाहिले असाल यामध्ये प्राण्यांशीसंबंधीत काही माहिती दाखवली जाते. शिवाय त्यांचे फोटो व्हिडीओ देखील दाखवले जातात. वन्य प्राण्यांची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांची शिकार करण्याची शैली. यामध्ये त्यांच्या तत्परतेची आणि हुशारीची कसोटी लागते. चित्ता त्याच्या वेगवान वेगासाठी ओळखला जातो आणि काही वेळातच तो 120 किमी प्रतितास वेग गाठू शकतो. त्याच्या वेगवान गतीमुळे, तो आपला शिकार पकडण्यात क्वचितच अपयशी ठरला आहे. VIDEO : ‘‘रेनकोर्ट कुठं आहे त्याचा?’’ पावसात भिजणाऱ्या बाप्पाला पाहून चिमुकलीचा निरागस प्रश्न सोशल मीडियावर चित्त्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ आहेत, मात्र नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्त्याचा अप्रतिम वेग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की, जणू काही आपण जंगलात उपस्थित असताना हे दृश्य पाहत आहोत. इतकं ते खरं वाटत आहे.
forest_travel_व्हिडीओ अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडीओमध्ये चित्ता दिसत आहे. त्यानंतर चित्त्याने सरपटणाऱ्या प्राण्याच्या मागे शिकारीसाठी पळतो. एवढ्या अंतरापर्यंत इतक्या वेगाने चित्याचं धावणं आणि मग शिकार जवळ येताच धक्का देऊन थांबण्याची चित्त्याची अद्भुत क्षमता या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. त्याला वेगात येताना पाहून त्याला थांबवणं अशक्यच वाटतं, पण शिकाराजवळ येताच तो त्याला सहज पकडतो. जगातील 9 असे कुत्रे जे संपवू शकतात सिंहाचाही खेळ आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. चित्याला असं कदाचित अनेकांनी पहिल्यांदा पाहिलं असेल. ज्यामुळे लोकांना फारच आश्चर्य वाटत आहे.