मुंबई, 07 जुलै : लहान मुलं फारच निरागस असतात. ते मोठ्या माणसांसारखा आपल्यापूर्ता विचार कधीच करत नाही. शिवाय त्यांच्या मनात भेदभाव देखील नसतो. तुम्ही सोशल मीडियावर लहानमुलां संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असेल. जे खूपच क्यूट असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल आणि तुम्ही त्या मुलाचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. लहान मुलांना नेहमी प्रश्न विचारण्याची सवय असते, कारण त्यांना आयुष्यात ऐवढे प्रश्न पडतात की बस्स… ही मुलं मोठ्यामाणसांवर प्रश्नांचं नुसतं भडीमारच करतात. कधीकधी तर मोठ्या माणसांना देखील त्यांच्या प्रश्नांचं उत्तर माहित नसतं. या व्हिडीओमधील चिमुकलीने देखील असाच प्रश्न विचारला. Reels वेडा माकड कधी पाहिलाय? माकडाचा हा क्यूट Video पोट धरुन हसवणारा पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेला चिमूकला देवाच्या ठिकाणी पोहोचला, तेथे गणपती बप्पाला त्याने पावसात भिजताना पाहिले. आपल्याकडे पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट आहे मग बाप्पाकडे का नाही? असा प्रश्न तिच्या मनात आला आणि तिने आपल्या बाबांना विचारलं की, “रेनकोट… रेनकोट कुठे आहे त्याचा?” या चिमुकल्याचं बोलणं ही फार गोड आहे शिवाय त्याला पडलेला हा प्रश्न आपल्या सर्वांना ही विचार करायला लावणारा आहे. कधी माकडाला पाहिलंय पानीपुरी खाताना, क्यूट Video ने नेटकऱ्यांना लावलं वेड तसे पाहाता लहान मुलांना गणपतीबद्दल विशेष आकर्षण असते. शिवाय हत्तीच्या डोक्याच्या देवाबद्दल त्यांना अधिकच उत्सुकता वाटते. या व्हिडीओमधील मुलीला देखील आपल्या बाप्पाबद्दल काळजी वाटली आणि तिने असा प्रश्न उपस्थीत केला. पण यानंतर काहीतरी वेगळं उत्तर देऊन या चिमुकलीचं लक्ष वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न केला गेला.
Tiny Devotee, Big Question!
— Godman Chikna (@Madan_Chikna) July 6, 2023
A kid enquiring about Ganpati Bappa’s raincoat 😍🥹 pic.twitter.com/kIzfQ3DWxP
या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडीओ शेअर आणि अपलोड करण्यात आला आहे. चिमुकलीचं असं बोलणं खरंच भुरळ पाडणारं आहे. नेटकऱ्यांना तिच्या अशा बोलण्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच दिवसभराचा थकवा विसरायला लावणारा आहे.