सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याला जंगलातील सर्वच प्राणी घाबरतात. सिंहाने एखाद्याची शिकार करायची ठरवली ना की मग तो प्राणी सिंहाच्या तावडीतून वाचणे कठीण आहे. सिंहाची ताकद आणि त्याचा एक वारच एखाद्या प्राण्यांना गार करायला पुरेसं आहे. त्यामुळे शक्यतो वाघ किंवा बिबट्या देखील त्याच्या वाट्याला जात नाहीत. पण तुम्हाला माहितीय का की असे काही कुत्रे आहेत. जे सिंहाचीही शिकार करु शकतात?
रॉटविलर डॉग Rottweiler या कुत्र्यामध्ये प्रचंड ताकद असते. बॉडीबिल्डरसारखी यांची शरीर रचना असते. त्याने एकदा का आपल्या जबड्यात गोष्ट पकडली तर ती सुटणंही कठीण, त्यामुळे तो आपल्या धोकादायक जबड्याच्या सहाय्याने सिंहाचाही जीव जाऊ शकतो असं म्हटलं जातं.
तिबेटियन मस्तिफ Tibetan Mastiff याला कुत्र्याला किंग ऑफ डॉग्स म्हणतात. हे कुत्रे आपल्या टोळीसोबत राहाणं पसंत करतात आणि ते अत्यंत प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे हे कुत्रे आपल्या लोकांसाठी काहीही करण्याची तयारी देखवतात. त्यामुळे ते सिंहाला देखील मारु शकतात.
बोएरबोल Boerboel कुत्र्याची ही प्रजाती दक्षिण आफ्रिकेतील आहे. फिटनेससाठी आणि आपल्या अॅग्रेसिव्हनेससाठी हा खूप प्रसिद्ध आहे.
Caucasion Shepherd हा शियन प्रजातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा स्ट्रेंथ, प्रोटेक्टिव्ह नेचरसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्यात इतकी ताकद आहे की तो सिंहाचाही खेळ संपवू शकतो असा दावा करण्यात येत आहे.
कंगाल Kangal ही तुर्कीमधील प्रजाती आहे. संकट आलं तर हे कुत्रे आपला जीव वाचवण्यासाठी समोरच्यालाही सोडत नाहीत ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर सिंह काहीच नाही.
डोगो अर्जेंटिनो Dogo Argentino हा कुत्रा अर्जेंटिनातील प्रजाती आहे. धावण्यात आणि शिकारीत तरबेज असे हे कुत्रे सिंहाला देखील संपवू शकतात.
Rhodesian Ridgeback साऊथ आफ्रिका मधील हा कुत्रा फार पूर्वीपासून सिंहाची शिकार करण्यासाठी वापरला जायचा. ते चपळ, कुशल आणि शिकारीत तरबेज असतात.
अमेरिकन पीट बुल - Terrier एकेकाळी ते शिकारीसाठी वापरले जायचे ते खूप शक्तीशाली असतात. त्यामुळे ते सिंहालाही मारु शकतो असं म्हटलं जातं.
कॅन कोर्सो cane corso हा इटलीमधील कुत्रा आहे, जो शिकारीसाठी एकेकाळी प्रसिद्ध होता. आताही तो सिंहाचा खेळ संपवू शकतो असं म्हटलं जातं.
इंग्लिश मस्तिफ English Mastiff हे कुत्रे एकटं राहाणं पसंत करतात. हा कुत्रा सर्वात मोठा आणि शक्तिशाली मानला जातो.