नवी दिल्ली 12 जानेवारी : सिंह जंगलाचा राजा असतो. हा प्राणी कोणत्याही प्राण्याची शिकार करून आपली भूक भागवतो. मात्र, या प्राण्याची भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांना आपले साथीदार गमवावे लागतात. एखाद्या पिल्लावर हल्ला केल्यास मादा प्राणी भडकते, मात्र सिंहाच्या ताकदीपुढे कोणी काहीच करू शकत नाही. मात्र, हे प्राणी एकत्र आले, तर हिंस्त्र सिंहालाही पळवून लावू शकतात (Wild Dogs Attack on Lion). सध्या एकतेची ताकद सांगणारा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.
OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक
YouTube चा एक Wildlife चॅनल King of Beasts वर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या चॅनलचे 6 हजार सब्सक्राईबर आहेत. हा व्हिडिओ तब्बल 38 लाख लोकांनी पाहिला आहे. घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी स्वतः हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की आपल्या पिल्लांना घेऊन काही जंगली कुत्रे काही वेळासाठी बाहेर आले होते. कदाचित ते काहीतरी खाण्यासाठी शोधत होते. मात्र, इतक्यात एका उपाशी सिंहाची नजर त्यांच्यावर पडली. या गोष्टीची चाहूल लागताच सर्व कुत्र्यांनी इथून धूम ठोकली मात्र यातील एक पिल्लू सिंहाच्या तावडीत सापडलं. सिंह आपली शिकार खाऊन आरामात बसण्याआधी पुढे असं काही घडलं, ज्याची कल्पनाही एखादा सिंह करू शकत नाही. जंगली कुत्र्यांच्या गटाने सिंहावरच हल्ला केला. जखमी सिंहाची अवस्था पाहून तुम्ही अंदाज लावू शकता, की कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचणं सोपं नव्हतं.
Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO
कुत्र्यांनी सिंहाला बराच वेळ आणि भरपूर दूरपर्यंत पळवलं. जवळ येताच ते सिंहावर हल्लाही करत राहिले. या संपूर्ण घटनेदरम्यान काही पर्यटक तिथेच उपस्थित होते. या पर्यटकांनी सुरुवातीला सिंहाला शिकार करताना आणि नंतर स्वतःच शिकार बनताना आपल्या डोळ्यांदेखत पाहिलं. हे दृश्य पाहून पर्यटकही घाबरले होते. मात्र, हे वातावरण शांत होईपर्यंत इथून निघण्याचा त्यांच्याकडे काहीही मार्ग नव्हता.