जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक

OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक

OMG! जंगलात 6 सिंहासोबत फिरताना दिसली तरुणी; VIDEO पाहून व्हाल शॉक

महिला जंगलात 6 सिंहिणींसोबत आरामात फिरत आहे (Woman Walking With 6 Lioness), जणू ते तिचे पाळीव श्वान आहेत. हा व्हिडिओ खरोखरच हैराण (Shocking Video Viral) करणारा आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) कधीकधी असे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं, जे पाहून आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मात्र, जगात अनेक असे लोक असतात, जे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक महिला जंगलात 6 सिंहिणींसोबत आरामात फिरत आहे (Woman Walking With 6 Lioness), जणू ते तिचे पाळीव श्वान आहेत. हा व्हिडिओ खरोखरच हैराण (Shocking Video Viral) करणारा आहे. हा व्हिडिओ पाहून कोणच्या काळजाचे ठोके वाढतील. डोंगरावर फिरायला गेलेल्या व्यक्तीचा पाठलाग करू लागला सिंह अन्…; Shocking Video हा व्हिडिओ काही सेकंदांचाच आहे. मात्र, तो पाहून नक्कीच तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ जंगलात शूट केला गेला आहे. यात एक महिला सहा सिंहिणींसोबत अगदी आरामात फिरताना दिसते. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान एकही सिंहिण महिलेवर हल्ला करत नाही. महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून असं वाटतं की तिला या सिंहिणींची जराही भीती नाही.

जाहिरात

हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यूजरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, आयुष्यात कधी ना कधी, ते काम नक्की करा, ज्याची तुम्हाला भीती वाटते. तर तुम्हाला हे करून पाहायला आवडेल? एका दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ पाहून सगळे हैराण आहेत, की अखेर या सिंहिणी महिलेवर हल्ला का करत नसाव्या. तर काही यूजर्सचं असं म्हणणं आहे, की जर या सिंहिणी हल्ला करत नसतील, तर आम्हालाही त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवायला आवडेल. क्रॅश झालेल्या विमानाला ट्रेनने दिली धडक; थोडक्यात बचावला पायलटचा जीव, VIDEO सफारी गॅलरीने पुढे माहिती देत सांगितलं, की सिंह आधी संपूर्ण आफ्रिका, आशिया आणि यूरोपात आढळत असे. मात्र आता केवळ अपवादात्मक स्थितीतंच आफ्रिकेत आढळतात. बाकी आशियाई सिंह भारतात सासन-गिर नॅशनल पार्कमध्ये दिसतात. यासोबतच हेदेखील सांगण्यात आलं, की सिंहाची डरकाळी 5 मील दूरवरुनही ऐकू येते. एक सिंह 50 मील प्रति तास वेगाने पळू शकतो आणि 36 फूटापर्यंत उडी घेऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात