मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोनं पतीला अक्षरशः कुत्रा बनवलं; गळ्यात पट्टा घालून गावभर फिरवलं, कारण वाचून लावाल डोक्याला हात

बायकोनं पतीला अक्षरशः कुत्रा बनवलं; गळ्यात पट्टा घालून गावभर फिरवलं, कारण वाचून लावाल डोक्याला हात

ब्राझिलमधील (Brazil) कपलने आपल्यातील प्रेम आणि रोमान्स कायम ठेवण्यासाठी अत्यंत अजब पद्धत (Weird Couple) वापरली. या कपलने मॉलमध्ये फोटोशूट केलं.

ब्राझिलमधील (Brazil) कपलने आपल्यातील प्रेम आणि रोमान्स कायम ठेवण्यासाठी अत्यंत अजब पद्धत (Weird Couple) वापरली. या कपलने मॉलमध्ये फोटोशूट केलं.

ब्राझिलमधील (Brazil) कपलने आपल्यातील प्रेम आणि रोमान्स कायम ठेवण्यासाठी अत्यंत अजब पद्धत (Weird Couple) वापरली. या कपलने मॉलमध्ये फोटोशूट केलं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : जगभरातील कपल्स आपल्यातील प्रेम (Love) आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी अनेक अजब कामं करतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या सवयीही सामील असतात. काहींना रोल प्ले करणं आवडतं. काही कपल अनोळखी बनून पुन्हा एकमेकांना डेट करण्याची अॅक्टिंग करतात. मात्र, ब्राझिलमधील (Brazil) कपलने आपल्यातील प्रेम आणि रोमान्स कायम ठेवण्यासाठी अत्यंत अजब पद्धत (Weird Couple) वापरली. या कपलने मॉलमध्ये फोटोशूट केलं. यादरम्यान पतीनं कुत्र्याप्रमाणे वेशभूषा केली (Husband Leased As Dog) आणि त्याची पत्नी त्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला फिरवताना दिसली.

जंगल सफारीसाठी गेलेल्या तरुणाला ती चूक भोवली; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा

ब्राझीलमध्ये राहणारी लुआना कजाकी आणि आर्थर ओउर्सो यांच्या फोटोशूटने सर्वांनाच हैराण केलं. कपलनं आपल्या फॅन्टसीमध्ये एका स्टेशनवर फोटोशूट केलं. यादरम्यान आर्थर कुत्र्याच्या वेशभूषेत दिसला. त्याच्या मानेला एक लोखंडी साखळी बांधली गेली होती. त्याची पत्नी हीच साखळी आपल्या हातात पकडून पतीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत होती. दोघांना पाहून आसपासचे लोकही हैराण झाले. हे कपल स्टेशनवरुन मॉलमध्येही पोहोचलं. यानंतर दोघंही एका बेकरी हाऊसमध्ये गेले. इथे महिलेचा पती कुत्र्याप्रमाणेच बांधलेल्या अवस्थेतच पदार्थ खाताना दिसला.

इंडिपेन्डंटला दिलेल्या मुलाखतीत या कपलनं सांगितलं, की लोक काय म्हणतात याने त्यांना काहीही फरक पडत नाही. ते काहीही चुकीचं काम करत नाहीयेत. दोघांचीही ही इच्छा होती आणि त्यांनी कोणालाही त्रास न देता ती पूर्ण केली. या सर्वामुळे त्यांचं एकमेकांवरील प्रेम आणखीच वाढलं असून त्यांचा उद्देश पूर्ण झाला. कपल केवळ मॉलमध्ये फिरलंच नाही तर कुत्र्याप्रमाणे जमिनीवर बसून त्यानं आपल्या पत्नीसाठी शॉपिंगही केली. यानंतर दोघंही बेकरी हाऊसमध्ये काहीतरी खाण्यासाठी पोहोचले.

रेस्टॉरंटनं लॉन्च केलं मानवी मांसाची चव असलेलं बर्गर; खाण्यासाठी लोकांची गर्दी

या सर्वादरम्यान लोक या कपलचे फोटो काढू लागले. कोणी काही सवाल केल्यास महिला उत्तर देत असे की ती फक्त आपल्या कुत्र्याला फिरवत आहे. लोक एकटक या अजब कपलकडे पाहत होते. मात्र, दोघंही अगदी मोकळेपणाने फिरत राहिले आणि फोटोशूट करत राहिले.

First published:

Tags: Love story, Viral news