मराठी बातम्या /बातम्या /Viral /जंगल सफारीसाठी गेलेल्या तरुणाला ती चूक भोवली; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा अन्...

जंगल सफारीसाठी गेलेल्या तरुणाला ती चूक भोवली; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा अन्...

टॉयलेटचा वापर करत असताना कोब्रा सापाने या व्यक्तीला चावा केला. यानंतर तब्बल तीन तास ही व्यक्ती त्याच अवस्थेत पडून राहिला

टॉयलेटचा वापर करत असताना कोब्रा सापाने या व्यक्तीला चावा केला. यानंतर तब्बल तीन तास ही व्यक्ती त्याच अवस्थेत पडून राहिला

टॉयलेटचा वापर करत असताना कोब्रा सापाने या व्यक्तीला चावा केला. यानंतर तब्बल तीन तास ही व्यक्ती त्याच अवस्थेत पडून राहिला

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत जंगल सफारीचा (Jungle Safari) आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसोबत मोठी दुर्घटना घडली. सापाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतल्याने त्याची वाईट अवस्था झाली (Cobra Snake Bites Man's Private Part). या व्यक्तीला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला वाचवण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. 47 वर्षीय डच नागरिक स्वच्छतागृहात गेला असताना ही घटना घडली.

समोर बिबट्या दिसताच कुत्र्याला आला हृदयविकाराचा झटका; तडफडून मृत्यू, VIDEO

मिररच्या वृत्तानुसार, टॉयलेटचा वापर करत असताना कोब्रा सापाने या व्यक्तीला चावा केला. यानंतर तब्बल तीन तास ही व्यक्ती त्याच अवस्थेत पडून राहिली. नंतर त्याला 350 किलोमीटर दूर एका ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. मात्र तोपर्यत या व्यक्तीच्या गुप्तांगात तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या आणि ती छातीपर्यंत पोहोचल्या होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ही पहिलीच घटना आहे, ज्यात कोब्राने एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगावर हल्ला केला आहे.

जेव्हा या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याचा प्रायव्हेट पार्ट वाईट पद्धतीनं सूजला होता. पीडित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याची सर्जरी करावी लागली. ट्रॉमा सेंटरमधील एका डॉक्टरनं सांगितलं, की याआधी असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही, ज्यात एखाद्या कोब्राने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावलं.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूचा खेळ, ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO

दक्षिण अफ्रिकेतील घनदाट जंगलं अनेक सापांचं घर आहेत. त्यामुळे कधीकधी थोडा हलगर्जीपणाही मोठ्या अडचणी घेऊन येतो. सापानं चावा केल्याने अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र, सुदैवाने या डच नागरिकाचा जीव वाचला. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची Reconstructive Surgery करावी लागली.

First published:

Tags: King cobra, PRIVATE part