जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रेस्टॉरंटनं लॉन्च केलं मानवी मांसाची चव असलेलं बर्गर; खाण्यासाठी लोकांची गर्दी, नेमकं काय आहे प्रकरण?

रेस्टॉरंटनं लॉन्च केलं मानवी मांसाची चव असलेलं बर्गर; खाण्यासाठी लोकांची गर्दी, नेमकं काय आहे प्रकरण?

रेस्टॉरंटनं लॉन्च केलं मानवी मांसाची चव असलेलं बर्गर; खाण्यासाठी लोकांची गर्दी, नेमकं काय आहे प्रकरण?

स्विडनच्या या कंपनीने सांगितलं, की त्यांनी एक असं बर्गर बनवलं आहे ज्याची चव मानवी मांसाप्रमाणे आहे. हे बर्गर मागील आठवड्यातच लॉन्च झालं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : जगात मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांची (Non Veg Lovers) संख्या कमी नाही. प्रत्येक देश आणि प्रत्येक रेस्टॉरंट आपल्या स्पेशल डिशमुळे चर्चेत असतं. लोक चिकन, मटणपासून पोर्क आणि बीफही खातात. मात्र आता मानवी मांसही खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र स्विडनच्या एका रेस्टॉरंटनं आपल्या मेन्यूमधील एका बर्गरमध्ये मानवी मांसाच्या चवीचं मटण (Human Meat Burger) असल्याचा दावा केला आहे. मात्र रेस्टॉरंटनं हेदेखील स्पष्ट केलं आहे, की याची केवळ चव मानवी मांसाप्रमाणे आहे. प्रत्यक्षात असं काहीही नाही. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूचा खेळ, ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO स्विडनच्या या कंपनीने सांगितलं, की त्यांनी एक असं बर्गर बनवलं आहे ज्याची चव मानवी मांसाप्रमाणे आहे. हे बर्गर मागील आठवड्यातच लॉन्च झालं आहे. हे ह्यूमन मीट बर्गर प्रसिद्ध कंपनी Oumph ने बनवलं आहे. ही कंपनी प्लांट बेस्ड मीट बनवते. म्हणजेच या कंपनीच्या मानवी मांसाप्रमाणे चव असणाऱ्या बर्गरमध्ये मानवी मांस वापरलं गेलं नाही. कंपनीनं सांगितलं, की त्यांनी लोकांना हे सांगण्यासाठी हे बर्गर बनवलं आहे, की प्राणी किंवा माणसांना नुकसान न पोहचवताही मीट बनवता येतं. याची चवही अगदी खऱ्या मटणाप्रमाणेच लागते. कंपनीच्या प्रमोशनची ही पद्धत लगेचच वादात आली. अनेकांनी हे विचित्र असल्याचं म्हटलं. एका व्यक्तीनं कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं, की मला हे खाता यायला हवं होतं. तर आणखी एकानं लिहिलं, की मानवी मांसाप्रमाणे असणारं हे बर्गर भीतीदायक आहे. आणखी एकानं कमेंट करत विचारलं की हे बर्गर बनवणाऱ्या व्यक्तीला हे कसं माहिती की मानवी मांस कसं लागतं? इतरही अनेकांनी यावर सवाल उपस्थित केले आहेत. 5 स्टार हॉटेलमध्ये ढेकणांचा धुमाकूळ, शेकडो किड्यांनी शोषलं रक्त कंपनीच्या को-फाउंडरनं सांगितलं, की त्यांनी अतिशय वेगळ्या चवीचं मीट बनवलं असून हे अतिशय स्वादिष्ट आहे. या बर्गरच्या माध्यमातून कंपनी लोकांना हे सांगू इच्छित आहे की प्लांट बेस्ड मांसदेखील टेस्टी असतं. हे बर्गर कंपनीने केवळ हॅलोविनपर्यंतच ऑफर केलं होतं. सध्या याची फक्त चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात