Home /News /viral /

नखरे करणाऱ्या नवऱ्याला पत्नीनं शिकवला धडा; आधी कानशिलात लगावली अन् मग..., पाहा VIDEO

नखरे करणाऱ्या नवऱ्याला पत्नीनं शिकवला धडा; आधी कानशिलात लगावली अन् मग..., पाहा VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजारी पती बेडवर बसलेला आहे. इतक्यात पत्नी तिथे येऊन त्याचा ताप तपासते.

  नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : पती आणि पत्नीचं नातं (Relation of Husband and Wife) हे मित्र आणि मैत्रिणीप्रमाणेच असतं. दोघंही एकमेकांसोबत आपलं संपूर्ण आयुष्य घालवत असतात. सुख-दुःख आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण काळात दोघंही एकमेकांची साथ देत असतात. दोघांनाही हे चांगलंच समजतं की आपल्या जोडीदाराच्या मनात नेमकं काय सुरू आहे. सध्या अशाच एक पती-पत्नीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Husband and Wife) होत आहे. यात पाहायला मिळतं, की आपल्या पतीला मनवण्यासाठी पत्नीनं अगदीच विचित्र अन् मजेशीर पद्धतीचा वापर केला आहे. बापरे रे बाप! इवल्याशा खारीचा एवढा मोठा 'कार'नामा; पाहूनच तोंडात बोटं घालाल पत्नीला आपल्या पतीची प्रत्येक सवय माहिती असते. याचमुळे पतीनं जर कोणती गोष्ट ऐकली नाही तर हे कसं हाताळायचं हेदेखील तिला चांगलंच माहिती असतं. मात्र, अनेकदा पत्नी आपल्या पतीला मनवण्यासाठी अजब पद्धतीचा वापर करते.
  View this post on Instagram

  A post shared by (@kaint_punjabi_couples_25)

  सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजारी पती बेडवर बसलेला आहे. इतक्यात पत्नी तिथे येऊन त्याचा ताप चेक करते. पतीला ताप असल्याचं पाहताच ती त्याला औषध खाण्यासाठी देऊ लागते, मात्र तो नकार देतो. सावध राहा! सार्वजनिक शौचालयातच दबा धरून बसलाय जंगलाचा राजा; हा VIDEO कुठला पाहा पत्नी अनेकदा त्याला औषध घेण्यास सांगते मात्र वारंवार तो नकार देतो. यानंतर पत्नी रागवली आणि पतीला औषध खाऊ घालण्यासाठी तिनं विचित्र पद्धतीचा वापर केला. तिनं आपल्या पतीला जोरात एक चापट मारली आणि मग पुन्हा त्याला औषध दिलं. यानंतर पती शांत बसला आणि लगेचच त्यानं ही गोळी खाल्ली. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पंजाबी कपल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच अनेकांनी लाईक केला आहे, सोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Wife and husband

  पुढील बातम्या