मुंबई, 04 ऑक्टोबर : सिंह (Lion video), वाघ, बिबट्या असे एरवी प्रत्यक्षात पाहायला न मिळणारे प्राणी (Animal video) पाहायला कुणाला आवडणार नाही. म्हणून तर आपण नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहालय किंवा जंगल सफारीवर जातो (Wild animal video). आपण जे प्राणी पाहायला आलो आहोत ते प्राणी पाहिले तरी तिथं घाम फुटतो. मग विचार करा, तुमच्या ध्यानीमनी नसताना अचानक असे प्राणी तुमच्यासमोर आले तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
जंगलाचा राजा सिंह जो जंगलात पाहायला मिळतो.तो रस्त्यावर फिरत असल्याचेही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले (Lion in public toilet video). पण आता हाच जंगलाचा राजा आता सार्वजनिक शौचालयातही दबा धरून बसलेला दिसला. चक्क एका पब्लिक टॉयलेटमधून सिंह बाहेर पडला.
Loo is not always safe & reliver for humans, sometime it can be used by others too...@susantananda3 @ParveenKaswan @PraveenIFShere @Saket_Badola pic.twitter.com/MNs9pwCycC
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) October 2, 2021
व्हिडीओत पाहू शकता ज्यामध्ये एक शौचालय दिसतं आहे. बऱ्याच वेळाने या शौचालयाच्या दारातून एक भलामोठा सिंह बाहेर पडतो. शौचालयाच्या दारात तो किती तरी वेळ उभा राहतो. त्याला प्रत्यक्षात पाहणाऱ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात हे खतरनाक दृश्य कैद करून घेतलं. त्यांना तर धक्काच बसला. व्हिडीओत त्यांचा आवाज ऐकून ते लोक किती घाबरलेले आहेत, हेसुद्धा समजतं आहे. थोड्या वेळाने सिंह टॉयलेटमधून बाहेर पडतो आणि दूर निघून जातो.
हे वाचा - Shocking video - पक्ष्याने धडक देताच पेटलं विमान; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या
@WildLense_India या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाल नेमकं हे सार्वजनिक टॉयलेट आहे कुठचं. आजूबाजूचा परिसर पाहता हे टॉयलेट एका जंगलातीलच आहे, पण कुठचं ते माहिती नाही. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हीसुद्धा फिरायला गेला तर टॉयलेटला जाताना जरा जपूनच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal