वॉशिंग्टन, 15 जानेवारी : महिलांच्या पर्समध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल. बऱ्याच नवऱ्यांना आपल्या बायकांच्या पर्समधील काही वस्तू म्हणजे वायफळ वाटतात. पण बायकोच्या पर्समधील अशाच फक्त 160 रुपयांच्या वस्तूने नवरा करोडपती बनला आहे. बायकोच्या पर्समध्ये नवऱ्याला अशी वस्तू सापडली जी उघडून पाहताच त्याचं नशीब फळफळलं. अमेरिकेतील कपल ची ही स्टोरी व्हायरल होते आहे. यूएसच्या कॅरोलिनामध्ये राहणारा 65 वर्षांचा टेरी पीस ज्याने 160 रुपयांना पॉवरबॉल लॉटरी चं एक तिकीट खरेदी केलं होतं. पण घरी आल्यानंतर तो हे तिकीट कुठे ठेवलं तेच विसरला. त्याने खूप शोधलं पण त्याला तिकीट सापडलंच नाही. अखेर त्याने आपल्या बायकोलाही आपण खरेदी केलेलं तिकीट हरवल्याचं सांगितलं आणि तिला ते शोधण्यात मदत करायला बोलला. त्यानंतर दोघंही मिळून ते तिकीट शोधू लागले. हे वाचा - दारू पिऊन टल्ली झाला बॉयफ्रेंड; गर्लफ्रेंडने जे केलं ते पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटं पत्नीने आपलं पर्सही तपासलं. जेव्हा तिने पर्स उघडलं तेव्हा त्यात तिला जे सापडलं ते पाहून दोघंही हैराण झाले. कारण जे तिकीट ते शोधत होते, ते तिकीट त्याच पर्समध्ये होतं. ज्याबाबत तिलाही माहिती नव्हतं. टेरीने हे तिकीट आपल्या बायकोच्या पर्समध्ये ठेवलं आणि तोसुद्धा विसरला. जे तिकीट हरवलं होतं. ते शोधून सापडलं. तिकीट सापडतात जेव्हा या कपलने तपासलं तेव्हा त्यांना चक्क लॉटरी लागली होती. तब्बल 8 कोटी रुपये ते जिंकले. द मिररच्या वृत्तानुसार टॅक्स कापून टेरीला 5 कोटी 78 रुपये मिळाले. आपण करोडपती होण्यात आपल्या बायकोची महत्त्वाची भूमिका आहे. तिच्यामुळेच आपलं आयुष्य बदललं असं टेरी सांगतो. टेरी म्हणाला, नशीब बायकोने तिकीट शोधलं. मी नशीबवान आहे. मला माझ्या नशीबावर विश्वास होता. यामुळे आमचं आयुष्य बदललं आहे. आम्हाला किती आनंद होतो आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे वाचा - नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; फक्त फोटोचा हा छोटा उपाय, त्यांचं ब्रेकअप झालंच समजा करोडपती झाल्यानंतर टेरी आता निवृत्ती घेत पुढील आयुष्य ऐशोरामात जगण्याची प्लॅनिंग करत आहे. या पैशांतून तो आपलं घर सुधारण्याचा आणि ट्रक खरेदी करण्याचा विचार करतो आहे. शिवाय आपल्या नातवंडांसाठीही काही पैसे बचत करून ठेवणार असल्याचं या कपलनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.