मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; फक्त फोटोचा हा छोटा उपाय, त्यांचं ब्रेकअप झालंच समजा

नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; फक्त फोटोचा हा छोटा उपाय, त्यांचं ब्रेकअप झालंच समजा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

तुम्हा दोघात अडचण ठरणाऱ्या त्या तिसऱ्याला तुमच्या नात्यातून दूर करण्याचा सोपा उपाय तज्ज्ञांनी दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 जानेवारी : तुमच्या नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर आहे का? यामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला आहे का? तुमचा नवरा तुम्हाला वेळ देत नाही, रोज तुमची भांडणं होत आहेत? तुम्हा दोघांच्या नात्यातून त्या तिसरीला बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय काय नाही करून पाहिलं. पण कशाचा काहीच फायदा झाला नाही का? तर डोंट वरी... आता तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यातून त्या दुसऱ्या महिलेला दूर करण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. फक्त एक फोटोच तुमचं मोठं काम करेल. एक फोटो तुमच्या नवऱ्याचं त्या महिलेसोबत ब्रेकअप घडवून आणेल.

आता तुम्ही म्हणाल हा फोटो म्हणजे तुमच्या नवऱ्याचं किंवा त्या महिलेचं काही पितळ वगैरे उघडं पाडणारं असेल तर असं बिलकुल नाही. हा फोटो तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात असलेल्या त्या महिलेचा आहे. जो तुमच्याकडे असायला हवा, त्या महिलेचं नावही तुम्हाला माहिती असायला हवं.

हे वाचा - कुंडलीतील या कारणांमुळेही होतो विवाहात विलंब, करून पहा चमत्कारिक हे उपाय

नवरा-बायको असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड अशा कपलच्या लाइफमध्ये अशा तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली जिच्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली आहे, तर तिला नात्यातून कसं बाहेर काढायचं याचा उपाय तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅरोट रिडर आणि हिलर करिश्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी दोघातील तिसऱ्याला फुटवण्याचा सोपा फंडा व्हिडीओतून दाखवला आहे.

हे वाचा - लग्न होण्यासाठी कुंडलीतील किती गुण जुळले पाहिजेत? जाणून घ्या, गुण मिलनाची पद्धत

आता तुम्हाला नेमकं करायचं काय आहे तर करिश्मा यांनी एक चिन्हं रेखाटून दाखवलं आहे. हे चिन्हं त्या तिसऱ्या व्यक्तीच्या फोटोच्या मागच्या बाजूला काढायचं आहे.

त्या फोटोमागे हे चिन्हं काढल्यानंतर कपाटात तुमच्या कपड्यांमध्ये हा फोटो लपवून ठेवा.

कोणत्याही शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करा.

तुम्हाला याचा परिणाम दिसून आल्यानंतर या फोटोची विल्हेवाट लावा.

तुमची चांगल्या वृत्तीने हे करत असाल तर याचा परिणाम तुम्हाला दिसेल. वाईट वृत्तीने किंवा स्वार्थासाठी हे करण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्लाही करिश्मा यांनी दिला आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope, Couple, Relationship, Vastu