वॉशिंग्टन, 08 जानेवारी : कपलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात. अशाच एका कपलच्या व्हिडीओ ने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा हा व्हिडीओ आहे. ज्यात बॉयफ्रेंड दारू पिऊन टल्ली झाला आहे. त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने भररस्त्यात त्याच्यासोबत जे केलं ते थक्क करणारं आहे. यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. सामान्यपणे मित्रांसोबत दारू पार्टी करू नको, दारू पिऊ नको असे उपदेश देणाऱ्या बऱ्याच गर्लफ्रेंड आहेत. तर काही गर्लफ्रेंड स्वतःही आपल्या बॉयफ्रेंडसोबत दारू पितात. पण हा व्हिडीओ मात्र थोडा वेगळा आहे. यात जे गर्लफ्रेंडने दारूड्या बॉयफ्रेंडसोबत केलं ते कदाचित आजवर कोणत्याच गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसाठी केलं नसावं. आता इतकं वाचून तुम्हाला हा व्हिडीओ पाहण्याची उत्सुकता लागली असेल. हे वाचा - अरे हिला आवरा! मेट्रोत कुणीच नाही म्हणून तरुणीचा नको तो प्रताप; VIDEO VIRAL, कारवाईची मागणी व्हिडीओत पाहू शकता तरुण आणि तरुणी एकत्र चालताना दिसत आहेत. तरुणीने तरुणाला पकडलं आहे आणि त्याला चालवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती इतकी दारू प्यायला आहे की त्याचा स्वतःवर कंट्रोल नव्हता. त्याला नीट चालणं सोडा उभंही राहता येत नव्हतं. त्याचे पायही जमिनीला लागत नाही आहेत. त्यावरूनच तो किती दारू प्यायाला याचा अंदाज तुम्हाला आला असेल. सुरुवातीला तरुणीने त्याला धरून चालवत नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तोल जात होता.
शेवटी तरुणी त्याला तसंच आपल्या खांद्यावर उचलते आणि चालत जाताना दिसते. बॉयफ्रेंड दारू प्यायला असल्याने त्याचा संपूर्ण भार तरुणीवरच आहे, त्यामुळे तिलाही त्याचं वजन पेलवत नाही. तरी कसंबसं ती पावलं टाकत पुढे जाते. दारूड्या बॉयफ्रेंडसोबत तरुणीला असं काही करताना पाहून सर्वजण शॉक झाले. तिथल्याच कुणीतरी हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. टिकटॉकवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 11 सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा -
Video : लग्नात गर्लफ्रेंडला स्त्रीवेशात भेटायला गेलेल्या प्रियकराची जोरदार धुलाई ही घटना नेमकी कुठली आहे हे माहिती नाही, पण हा न्यू इअर सेलिब्रेशनच्या दिवशी हे घडलं आहे आहे, असं न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीत म्हटलं आहे.
या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. कुणी तरुणीच्या हिमतीला दाद दिली आहे, तर कुणी याला खरं प्रेम म्हटलं आहे. काही तरुणांनी तर प्रत्येक दारूड्याला अशी गर्लफ्रेंड भेटावी असं म्हटलं तर काहींनी आपल्यालाही अशीच गर्लफ्रेंड हवी अशी इच्छा व्यक्त केली. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.