Home /News /viral /

हेच बाकी होतं! संशयी बायकोने नवऱ्याच्या पँटलाच ठोकलं दरवाजाचं टाळं; VIDEO VIRAL

हेच बाकी होतं! संशयी बायकोने नवऱ्याच्या पँटलाच ठोकलं दरवाजाचं टाळं; VIDEO VIRAL

Wife locked husbands pant : कुणी विचारही केला नसेल असं या महिलेने आपल्या पतीसोबत केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : बरेच कपल आपले व्हिडीओ, फोटो, विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे (wife husband funny video). महिलेने आपल्या नवऱ्यासोबत जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत (couple funny video). कुणी विचारही केला नसेल असं या महिलेने आपल्या पतीसोबत केलं आहे (wife locked husbands pant). हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Social media viral video). काही पुरुषांचे लग्नानंतरही दुसऱ्या महिलेसोबत संबंध असतात, तर काही महिला या संशयी असतात. आपला नवरा आपल्या मागे, आपण नसताना किंवा आपल्या अनुपस्थित काय करतो याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्याने असं काही करू नये, यासाठीही त्या काही ना काही तरी उपाय करतात. या महिलेने तर हद्दच केली आहे (woman lock man's pant). तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या महिलेने चक्क आपल्या नवऱ्याच्या पँटलाच टाळं ठोकलं आहे (wife put lock in husbands pant). हे वाचा - OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या संशयी बायकोने आपल्या नवऱ्याच्या पँटला दरवाजाचं टाळं ठोकलं आहे.  ही महिला बॅग घेऊन कुठेतरी बाहेर जायला निघाली आहे. त्यानंतर नवरा एकटाच घरात. त्याने काही प्रताप करू नये, म्हणून हिने प्रताप केला. व्हिडीओत पाहू शकता तिने नवऱ्याच्या पँटला दरवाजाची कडी लावली आहे आणि त्याला कुलूप लावलं आहे. त्याची पँट लॉक केल्यानंतर ती बॅग घेते आणि दरवाजा उघडून घराबाहेर जाते. हे वाचा - महिलेने तर कमालच केली! चक्क नूडल्सपासून बनवला स्कार्फ; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO बाबा फन सेंटर युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटत आहेत. काहींनी महिलेने जे केलं ते योग्यच केलं असं म्हणत तिची बाजू घेतली आहे. तर बहुतेकांनी मात्र हा व्हिडीओ पाहताच आपला संताप व्यक्त केला आहे. आता हेच बघायचं राहिलं होतं, हे पाहण्याआधी माझा मृत्यू का झाला नाही अशा कमेंट युझर्सनी केल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Viral, Viral videos

    पुढील बातम्या