जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिलेने तर कमालच केली! चक्क Noodles पासून बनवला Scarf; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

महिलेने तर कमालच केली! चक्क Noodles पासून बनवला Scarf; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

महिलेने तर कमालच केली! चक्क Noodles पासून बनवला Scarf; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO

Knitting with Noodles scarf video : नूडल्स स्कार्फचा हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी : व्हेज नूडल्स, नॉनव्हेज नूडल्स, नूडल्स फ्रँकी असे नूडल्सचे किती तरी वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवले असतील, खाल्ले असतील. पण कधी नूडल्सपासून स्कार्फ तयार केल्याचं पाहिलं आहे का? (Scarf by Noodles) सोशल मीडियावर सध्या अशाच नूडल्सच स्कार्पची चर्चा होते आहे (Knitting with Noodles). हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे  (Viral Video of noodles knitting). आपल्यापैकी बऱ्याच जणांना नूडल्स वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला आणि वेगवेगळ्या पद्धतीने खायला आवडता. या व्हिडीओत नूडल्सवर अशी हटके प्रक्रिया करण्यात आली आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.  थंडीत गरमागरम नूडल्स खायला अनेकांना आवडते. थंडी म्हटलं की आपण आपल्या शरीरावर स्कार्पही घेतो. असाच स्कार्फ चक्क नूडल्सपासून तयार करण्यात आला आहे. हे वाचा -  बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO पाहा; कान,डोळ्यावर विश्वास बसणार ना जसं लोकरीपासून स्कार्फ, स्वेटर विणावं तसं या व्हिडीओत नूडल्स विणले जात आहेत (Knitting Sweater with Noodles).  नूडल्सचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

जाहिरात

अवघ्या 8 सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता एका भांड्यात पाण्यात शिजलेले नूडल्स आहेत. हे नूडल्स घेऊन एक महिला दोन चॉपस्टिक्सवर ते गुंडाळत आहेत. विणकाम करण्याची सुईवर लोकर घेऊन जसं स्कार्फ, स्वेटर, टोपी याचं विणकाम केलं जातं अगदी तसंच ती नूडल्सचं विणकाम करते आहे. हे वाचा -  अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही @mixiaoz नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांना महिलेचा हा प्रयोग मजेशीर वाटला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात