नवी दिल्ली 21 ऑगस्ट : जगभरात नवरा बायकोमधील वादाची (Dispute Between Husband and Wife) अनेक विचित्र प्रकरणं समोर येत असतात. अनेक नाती (Relations) तुटतात आणि पुन्हा जोडलीही जातात. मात्र, अनेकदा लहान लहान चुकाही अगदी जवळची नाती उद्धवस्त करून टाकतात. एका महिलेनं आपल्या आयुष्यातील असाच अनुभव शेअर केला आहे. महिलेनं सांगितलं, की तिच्या पतीनं (Husband) सर्वच हद्दी पार केल्या आहेत. या महिलेनं आपली ओळख लपवत एका सोशल मीडिया साईटवर (Social Media Site) हे सर्व सांगितलं. महिलेनं सांगितलं, की तिला पाच आणि दोन वर्षांची दोन मुलं आहेत. ती आपल्या पतीसोबत राहते. कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या काही काळापासून तिचा पतीदेखील घरीच आहे. ही महिली गृहिणी आहे आणि घरीच आपल्या मुलांचा सांभाळ करते. Funny Video: शी! किती हा हावरटपणा; गरम तव्यावरच वऱ्हाड्यांनी मारला हात महिलेनं सांगितलं, की एक दिवस ती आपल्या दोन्ही मुलांना पतीसोबतच सोडून घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ झाल्यानंतर ती आपल्या अंगावर क्रीम लावत होती. इतक्यात तिचं लक्ष एका निळ्या रंगाच्या लाईटकडे गेलं. हे पाहून ती घाबरली, मात्र जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. बेवसाइट द सनच्या रिपोर्टनुसार, महिलेनं सांगितलं, की बाथरूमच्या एका कोपऱ्यात तिला ब्लिंक करणारा कॅमेरा दिसला. हे पाहताच तिला समजलं की या कॅमेऱ्यात ती अंघोळ करतानाही कैद झाली आहे. पतीचं हे कृत्य पाहून ती पुरती हादरून गेली. तिनं सांगितलं, की हा कॅमेरा तिच्या पतीनं पाळलेल्या एका कासवावर नजर ठेवण्यासाठी खरेदी केला गेला होता. त्यामुळे, हे घाणेरडं कृत्य आपल्या पतीनंच केलं असल्याचं महिलेला समजलं. यानंतर महिला लगेचच खालच्या मजल्यावर आली आणि तिनं पतीला हे करण्यामागचं कारण विचारलं. नवऱ्याने हातोडा थेट बायकोच्या गालावरच ठोकला; पुढे जे दिसलं ते पाहून बसेल शॉक यावर पतीनं सांगितलं, की तो केवळ या कॅमेऱ्याची तपासणी करत होता, की तो योग्य पद्धतीनं काम करतोय का. यानंतर महिलेनं हे फुटेज आपल्या पतीला डिलीट करण्यास सांगितलं आणि त्यानंही महिलेनं सांगितलेलं सर्व काही ऐकलं. महिलेनं हे सर्व सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं, की मला अक्षरशः लाज वाटत आहे. या घटनेत नेमकं काय करावं हेच समजत नसल्याचं तिनं म्हटलं. अनेकांनी कमेंट करत महिलेला पतीविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण, या व्यक्ती आपल्या पत्नीची व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करण्यासाठी हे सर्व करत असावा, असा अंदाज अनेकांनी लावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.