मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Funny Video: शी! किती हा हावरटपणा; डोसा तयार होण्यापूर्वीच गरम तव्यावरच वऱ्हाड्यांनी मारला हात

Funny Video: शी! किती हा हावरटपणा; डोसा तयार होण्यापूर्वीच गरम तव्यावरच वऱ्हाड्यांनी मारला हात

कुठून येतात ही माणसं???

कुठून येतात ही माणसं???

लग्नातील आचारी मात्र यामुळे पुरताच चिडला आहे. तो गरम तवा तसा सोडून मागे सरकला. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू आवरू शकणार नाही

  • Published by:  Meenal Gangurde
भारतात लग्न हा एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. आयुष्यात एकदाच लग्न होतं असल्याचं मानुन लोक लाखो-कोटी रुपयांचा खर्च करतात. अनेकदा तर या खर्चाला सीमाच नसते. लग्न हे केवळ नवरा-नवरीसाठीच नाही तर लग्नाच येणाऱ्या पाहुण्यांसाठीही खास असतं. अर्थात यामागे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असू शकतात. कोणाच्या मित्राचं लग्न (Wedding) असतं, तर कोणाच्या मुलीचं. मात्र असेही अनेक नग असतात, ज्यांना केवळ लग्नात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची आस असते.(Funny Video) लग्नातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. लग्नात खाण्याच्या स्टॉलवर (Food stall in wedding) मोठी पाहायला मिळत आहे. समोर आचारी मसाला डोसा तयार करीत आहे. मात्र पाहुण्यांना इतकी घाई झाली आहे की, त्यांनी मसाला डोसा तव्यावरुन वाढेपर्यंतही वाट पाहिली नाही आणि गरम गरम तव्यावरच हात मारायला सुरुवात केली. पाहुण्याच्या या वागणुकीमुळे आचारी पुरता चिडला. आणि रागाच्या भरात तो गरम तवा सोडून मागे झाला. हे ही वाचा-दरवाज्याच्या हँडलमध्ये टॉप-पायजमा अडकून महिलेचा मृत्यू; तपास अधिकारीही हैराण
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नातील खाण्याच्या स्टॉलसमोर मोठी गर्दी जमा झाली आहे. लोक पदार्थ घेण्यासाठी इतकी ओढाताण करीत आहेत, जणू काही भंडाऱ्यालाच आले आहेत. डोसा स्टॉलसमोरील गर्दी पाहून आचाऱ्याला मनस्ताप झाला आहे. त्यातही जेव्हा पाहुण्यांनी गरमा गरम तव्यावर हात मारल्या त्यानंतर तर भलताच चिडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर मजेशीर कमेंट्सही करीत आहेत. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, या पाहुण्यांनी पहिल्यांदा डोसा पाहिला का?
First published:

Tags: Food, Viral video., Wedding

पुढील बातम्या