मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पती'राजा'चा थाट तर पाहा! आधी बायकोने त्याच्या पायातील चपलाही काढल्या आणि दुसऱ्याच क्षणी...

पती'राजा'चा थाट तर पाहा! आधी बायकोने त्याच्या पायातील चपलाही काढल्या आणि दुसऱ्याच क्षणी...

एका क्षणी हा व्हिडीओ पाहून कित्येक पुरुषांना आपल्यासुद्धा अशी बायको हवी, असंच वाटेल पण...

एका क्षणी हा व्हिडीओ पाहून कित्येक पुरुषांना आपल्यासुद्धा अशी बायको हवी, असंच वाटेल पण...

एका क्षणी हा व्हिडीओ पाहून कित्येक पुरुषांना आपल्यासुद्धा अशी बायको हवी, असंच वाटेल पण...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 जून : नवरा (Husband) घरी येताच बायकोने (Wife) त्याच्या हातातील बॅग काढून ती योग्य जागी ठेवा, त्याच्या अंगावरील कोट किंवा जॅकेट काढा, त्याला पाणी द्या हे चित्र तसं बहुतेक घरात दिसतंच. पण एका महिलेनं तर यापुढेही जाऊन अगदी नवऱ्याच्या पायातील चपलाही काढल्या. सुरुवातीला तिनं आपल्या पतीचं अगदी राजासारखं (Husband wife video) स्वागत केलं. पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू (Husband wife funny video) आवरणार नाही.

सोशल मीडियावर एका दाम्पत्याचा व्हिडीओ (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरा घरी येताच घरातच असलेली त्याची बायको त्याचं अगदी एखाद्या राजासारखं शाही अंदाजात स्वागत करते. एका क्षणी हा व्हिडीओ पाहून कित्येक पुरुषांना आपल्यासुद्धा अशी बायको हवी, असंच वाटेल. पण दुसऱ्याच क्षणी नवरदेवासोबत जे घडतं ते पाहून तुम्ही हादराल.

व्हिडीओत पाहू शकता, एक महिला सोफ्यावर बसली आहे. तितक्यात दरवाजातून एक व्यक्ती येते. ही व्यक्ती म्हणजे त्या महिलेचा नवरा.

हे वाचा - कोरोना लस घेत नव्हती म्हणून दोन्ही हातपाय धरले आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

नवरा घरी आल्याचं बघताच महिला सोफ्यावरून उठते. सर्वात आधी नवऱ्याचं जॅकेट काढते, त्यानंतर त्याच्या हातातील काठी घेऊन ती बाजूला ठेवते. इथवरच ती थांबत नाही तर खाली वाकून नवऱ्याच्या पायातील चपलाही ती अगदी प्रेमाने काढते. नवरा नाही जणू काही राजाच, शहनशाहासारखं ती त्याचं स्वागत करते.

स्टोरी इथंच संपली नाही, खरं पिक्चर तर अजून बाकी आहे. नवऱ्याची इतकी सेवा केल्यानंतर ती त्याच्या गळ्यात अॅप्रन अडकवते आणि नवऱ्याला एका दिशेकडे जाण्याचा इशारा करते. नवरा गुपचूप त्या दिशेने जातो. त्यानंतर नवरदेव हॉलमधून दिसतात ते थेट किचनमध्ये. अगदी राजासारखा घरात आलेला नवरा किचनमध्ये नोकरासारखी भांडी घासताना दिसतो. आहे की नाही मोठा ट्विस्ट. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरलं नसेल.

हे वाचा - अशी रडली नवरी की नवऱ्याची लुंगीही सुटली; पाठवणीचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO

@JibbyD ट्विटर अकाऊंटने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पुरेपूर आनंद घेत आहेत आणि मजेशीर कमेंटही करत आहेत. कित्येकांनी तर असाच थाट असणाऱ्या नवऱ्यांना हा व्हिडीओ पाठवलाही असेल. तुम्हीसुद्धा मग ही बातमी नक्की शेअर करा.

First published:

Tags: Couple, Funny video, Viral, Viral videos, Wife and husband