मुंबई, 30 जून: कोरोना लस घेण्याची भीती (Fear of corona vaccine) अजूनही कित्येकांना वाटते. त्यातही फक्त कोरोना लस नाही तर किती तरी जणांना इंजेक्शनचीच (Fear of injection) भीती वाटते. सध्या उपलब्ध असलेली कोरोना लस इंजेक्शनमार्फतच दिली जाते आहे. त्यामुळे कोरोना लस घ्यायची असली तर इंजेक्शनच्या भीतीपोटी किती तरी लोक ती घेत नाहीत किंवा लस घ्यायला गेले तरी त्यांची काय अवस्था होते ते आपण पाहिलंच आहे. कोरोना लसीकरणाच्या कालावधीत असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या आणखी एक असा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक महिलेनं कोरोना लस घेताना (Woman scared of corona vaccine) केलेला ड्रामा दिसतो आहे.
कोरोना लस घेताना महिलेनं संपूर्ण लसीकरण केंद्रच हलवून सोडलं. तिला पाहून तर तिच्या आजूबाजूचे लोकही हादरले. कोरोना लस घेण्यास ती नकारच देत होती. त्यामुळे अखेर लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तिचे हातपाय धरले आणि पुढे काय घडलं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी व्हिडीओतच पाहा.
#VaxPhobia 😢😢😢😢😢😢HUMOUR again...☺️☺️☺️😊☺️
Perhaps she would have more pain where others "held" her than at PRICK. pic.twitter.com/0W3yvkQrtg — Rupin Sharma IPS (@rupin1992) June 29, 2021
व्हिडीओत पाहू शकता, महिला लस पाहून बिथरलीच आहे. तिला दोन नर्सनी धरून ठेवलं आहे. जेव्हा नर्स तिला कोरोना लस द्यायला जाते तेव्हा ती आपला हात वर करून तिला रोखते. लस देणारी नर्सही तिची ही अवस्था पाहून घाबरते.
हे वाचा - टेबलावर 2 काचेच्या बाटल्या, त्यावर पाय ठेवून महिलेचा योगा; पुढे घडलं असं की...
शेवटी मग आणखी दोन नर्स या महिलेच दोन्ही पायही धरतात आणि नाही नाही म्हणता अखेर तिला लस टोचली जाते. लस टोचल्यानंतर मात्र महिलेच्या चेहऱ्यावरील हावभाव आणखी पाहण्यासारखे आहेत. बस्सं! झालं इतकंच होतं, अशीच ती व्यक्त होताना दिसते. लस कधी टोचली जाते हेसुद्धा तिला समजत नाही. तेव्हा मग संपूर्ण लसीकरण केंद्रात एकच हशा पिकतो. त्या महिलेसह लसीकरण केंद्रावर सर्वच हसू लागतात.
हे वाचा - अशी रडली नवरी की नवऱ्याची लुंगीही सुटली; पाठवणीचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. वॅक्सफोबिया असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Funny video, Viral, Viral videos