• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अशी रडली, अशी रडली नवरी की नवऱ्याची लुंगीही सुटली; पाठवणीचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO

अशी रडली, अशी रडली नवरी की नवऱ्याची लुंगीही सुटली; पाठवणीचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO

नवरीच्या पाठवणीचा हा व्हिडीओ पाहून पहिल्यांदाच तुम्ही रडण्याऐवजी पोट धरून हसाल.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : लग्न (Wedding) म्हणजे धम्माल, मजामस्ती असते. संपूर्ण लग्न मजेशीर (Funny wedding video) असलं तरी लग्नाचा (Wedding video) शेवटचा क्षण म्हणजे नवरीची सासरी पाठवणी करताना प्रत्येकाला रडू कोसळलं. हा क्षण खूपच भावनिक असतो. कधी कधी फक्त मुलीच्या माहेरच्यांच्याच नाही तर सासरच्या मंडळींच्या डोळ्यातही पाणी येतं आणि असे व्हिडीओ (Social media viral video) पाहतानाही आपल्यालाही रडू कोसळतं. पण आता तुम्ही पाठवणीचा असा व्हिडीओ पाहणार आहात जो पाहून तुम्हाला रडू नाही तर हसू येईल. सासरी जाताना मुलगी आपल्या माहेरच्या मंडळींना मिठी मारून रडते हे तसं आपल्यासाठी काही नवं नाही. असाच हा व्हिडीओ आहे. पण या व्हिडीओ नवरीच्या रडण्यापेक्षा नवऱ्याची अवस्था पाहण्यासारखी आहे. नवरी अशी रडली आहे की त्यामुळे नवऱ्याची लुंगी (Groom lungi went off) अक्षरश: सुटली आहे. नेमकं या व्हिडीओत काय झालं ते तुम्हीच पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता, नवरी आणि नवरा एकत्र आहेत. नवरी खूप रडते आहे. रडत रडतच ती आपल्या नवऱ्यासोबत सर्वांना भेटते आहे, सर्वांचे आशीर्वाद घेते आहे. नवरा-नवरी असंच आपल्यापेक्षा मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायला जातात पण नवरा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकतो पण नवरी मात्र मागे फिरते आणि तिथं असलेल्या एका तरुणीला अचानक घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. मिठी मारून त्या दोघीही गोल फिरतात. हे वाचा - OMG! फक्त हातांनीच उचलून बाजूला केली गाडी; रिअल बाहुबलीचा 'कार'नामा तर पाहा तेव्हा नवरीमुळे नवरदेवाची लुंगीही सुटते. सर्वांसमोर नवरदेव उघडा पडतो. त्यानंतर आपली लुंगी पकडण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचं हसू बिलकुल आवरलं नसेल. किंबहुना हसून हसून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा पोट दुखू लागलं असेल. पाठवणीचा असा व्हिडीओ कदाचित तुम्ही कधीच पाहिला नसेल. हे वाचा - ओ तेरी! इतके जबरदस्त ठुमके लगावले की पँटही घसरली; डान्सचा मजेशीर VIDEO VIRAL idiotic_sperm इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: