मुंबई 30 जानेवारी : नवरा बायकोंमध्ये मैत्रीसारखं नातं असावं. या नात्यात भांडण, रुसवे-फुगवे हे सगळं होतंच. पण दोघांनीही एकमेकांशी साथ कधीही सोडली नाही आणि विश्वास ठेवला तर या नात्याला कधीही तडा जात नाही. पण असं असलं तरी देखील अशी अनेक नाती आहेत, जी तुटल्याची तुम्ही पाहिली असतील.
बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात ज्यामुळे जोडीदारासंदर्भात संशयाची पाल चुकचुकते. हा संशय कधी खोट ठरतो तर कधी तो खरा देखील असतो. त्यामुळे बहुतांश लोक या संशयाची शहानिशा करण्याचा प्रयत्न करतात, जेणे करुन नात्यात कटूता राहात नाही.
हे ही पाहा : 'या' कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ
एका कपलसोबत अशीच घटना घडली, येथे एका महिलेला आपला नवरा आपली फसवणूक करत असल्याचा संशय होता. अशा स्थितीत तिने आपल्या नवऱ्याचा पाठलाग केला. एक दिवस ती नवऱ्याचा पाठलाग करत मसाज पार्लरमध्ये पोहोचली. येथे तिने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले. यानंतर बायकोने त्या महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना थायलंडमधील फुकेतची आहे.
तेथील लोकल मीडियारिपोर्टनुसार थाई महिलेला तिच्या नवऱ्याचे अफेअर असल्याचा संशय होता. तिने आपल्या नवऱ्याची पर्स तपासली तेव्हा तिच्या शंकेचे रूपांतर आत्मविश्वासात झाले. या महिलेच्या नवऱ्याच्या पर्समध्ये त्याच्या मसाज पार्लरच्या पावतीसोबत दुसऱ्या महिलेसोबत फोटो होता.
याबद्दल, महिलेने एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले - "मला माझ्या पतीच्या अशा वागण्याचे पुरावे त्याच्या पर्समध्ये सापडले. अशा परिस्थितीत तो कुठे जातो हे जाणून घेण्यासाठी मी पाठलाग केला. तपासाअंती तो मसाज पार्लरमध्ये जाऊन दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. हे जाणून मला भीती वाटली कारण तो लैंगिक संक्रमित आजार घरी आणू शकतो."
पुढे महिलेने सांगितले की ती जेव्हा नवऱ्याच्या मागून गेली, तेव्हा तिने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेशी जवळीक साधताना पाहिले. हे पाहून ती संतापली आणि त्या महिलेवर तुटून पडली. तिने नंतर तिच्यावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला आणि केस ओढून महिलेला जमिनीवर पाडले. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Husband suicide, Relationship, Shocking, Top trending, Viral