जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'या' कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ

'या' कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सोडून अशा प्रकारचं नातं जपणं खूप क्लेशदायक असतं. हे थांबवणं अवघड काम आहे, असं दिसतं. कारण स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाचं मन परिवर्तनासाठी इतकं आतुर असतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 04 जानेवारी : वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी पती आणि पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि परस्परांवर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. अलीकडच्या काळात या गोष्टी कुठे तरी कमी होताना दिसतात. त्यामुळे प्रेमप्रकरण, पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि यामुळे विभक्त होण्याचं प्रमाण वाढत आहे. वैवाहिक जीवनात परस्पर सुसंवाद कमी झाल्यानेदेखील अशा गोष्टी घडत आहेत. अर्थात विवाहबाह्य संबंधास आणखी काही गोष्टी कारणीभूत असतात. या गोष्टी पती आणि पत्नी अशा दोघांशीच संबंधित असतात. या गोष्टींविषयी आणि त्या टाळण्यासाठी डॉ. वीरेंद्र भाटिया यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. `पंजाब केसरी`ने याविषयीचा ब्लॉग प्रसिद्ध केला आहे. वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी पती आणि पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास गरजेचा असतो; पण काही कारणांमुळे पती-पत्नीत कटुता निर्माण झाली तर ही गोष्ट नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. अनेकदा कोणत्याही कारणामुळे वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचादेखील प्रवेश होतो. हे ही पाहा : विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं लग्नानंतर अनेक पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतात. महिलादेखील याबाबतीत मागे राहत नाहीत. प्रत्येक माणसाला भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असतं. हे आकर्षण मानवी मेंदूमध्ये आढळणाऱ्या किस्पेप्टिन नावाच्या हॉर्मोनमुळे निर्माण होतं. या हॉर्मोनमुळेच स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यांना सेक्सची तीव्र इच्छा निर्माण होते. एका संशोधनात असं आढळून आलं आहे. या कारणास्तव पुरुषांप्रमाणेच काही विवाहित स्त्रियादेखील इतर पुरुषांकडे आकर्षित होतात. या प्रकारचं आकर्षण शारीरिक, तसंच अन्य प्रकारचंही असू शकतं. पुरुषांसाठी विवाहबाह्य संबंध हे मजेचे किंवा टाइमपास असू शकतात. या गोष्टी ते मित्रांसोबत अभिमानाने शेअर करतात. स्त्रियांना सुरुवातीला हे साहस वाटत असलं, तरी त्यांच्यासाठी या गोष्टी हानिकारक ठरू शकतात, असं मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. डेटिंगचा वाढता ट्रेंड आणि कोरोनामुळे लोकांचा जीवनाकडे बघण्याचा बदलेला दृष्टिकोन महिला आणि पुरुषांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यात आणि वैवाहिक नातेसंबंध तोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्याच्या काळात भारतात अनेक डेटिंग अॅप्स वेगानं लोकप्रिय होत आहेत. वुमन फर्स्ट डेटिंग अॅपच्या एका संशोधनातून तिसऱ्या नातेसंबंधाबाबत आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. त्यानुसार, महामारीनंतर डेटिंगबाबत लोकांचे विचार आणि वर्तणुकीबाबत मोठा बदल झाल्याचं दिसून आलं आहे. ते अल्कोहोलमुक्त ड्राय डेटिंगला पसंती देत असून शारीरिक गरजांपेक्षा भावनिक गरजांवर जास्त भर देत आहेत. याचाच अर्थ ते जोडीदाराचं शारीरिक रंग-रूप पाहण्यापेक्षा भावनिक पैलूंना जास्त महत्त्व देत आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर लोक त्यांचं काम आणि आयुष्य यांच्यातल्या संतुलनावर जास्त भर देत आहेत. याचाच अर्थ त्यांना कामासोबत त्यांच्यासाठी थोडा वेळ काढू शकेल अशा जोडीदाराची गरज असते. एका जागतिक संशोधनानुसार, जगभरातले 38 टक्के लोक अशा लोकांना डेट करण्यासाठी तयार आहेत, ज्यांना ते आपल्यासारखे समजत नाहीत. एकूणच 63 टक्के जण असे आहेत जे शारीरिक गरजांऐवजी भावनिक परिपक्वतेवर भर देत आहेत. याच संशोधनानुसार, गेल्या दोन वर्षांत दर तीन पुरुषांपैकी एकाने विवाह किंवा सीरियस नातेसंबंध संपवले आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू केला आहे. भारतात ही क्रेझ जास्त दिसून येत आहे. ही क्रेझ कायम राहील का? तर अजिबात नाही. ही नाती सामाजिक आणि भावनिक गरज म्हणून येत असल्याचं अनेक समाज शास्त्रज्ञांचं मत आहे. घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सोडून अशा प्रकारचं नातं जपणं खूप क्लेशदायक असतं. हे थांबवणं अवघड काम आहे, असं दिसतं. कारण स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाचं मन परिवर्तनासाठी इतकं आतुर असतं, की जाणूनबुजूनही ते या मार्गावर जातात. प्रथमतः काही प्रकरणांमध्ये जेव्हा एखाद्या मुलीचं तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावलं गेलं असेल, तर अशा परिस्थितीत ती तिचं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. तिला भूतकाळ विसरता येत नसल्यामुळे ती तिच्या नवीन जोडीदाराशी भावनिकरीत्या कधीही जोडली जाऊ शकत नाही. अशा स्थितीत ती तिच्या पहिल्या प्रेमाकडे आकर्षित होऊ लागते. वैवाहिक जीवनात अनेक वेळा पतीकडून प्रेम आणि पुरेसा वेळ न मिळाल्याने तरुणींना वैवाहिक जीवनाचा कंटाळा येतो. या काळात तिला अन्य पुरुषाकडून अटेंशन मिळालं, तर ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते. या कारणामुळे तिच्या वैवाहिक जीवनात कटुता येऊ लागते. बऱ्याचदा स्त्रियांना भावनिकदृष्ट्या एकटं वाटू लागतं. मग या एकटेपणावर मात करण्यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीचा आधार घेऊ लागतात. सर्वसाधारणपणे स्त्रियांना जेव्हा त्यांच्या पतीसोबत वेळ घालवण्याची, प्रेम, आदर मिळवण्याची संधी मिळत नाही तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो. अनेक वेळा स्त्रिया त्यांच्या जोडीदाराच्या बोलण्याने एवढ्या दुखावतात, की पतीचा बदला घेण्यासाठी दुसऱ्यासोबत अफेअर सुरू करतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, महिला जास्त भावनिक असल्याने अन्य पुरुषांसोबत असलेल्या नात्यात त्या मानसिकदृष्ट्या असंतुलित राहतात. त्यांचं इतरांसोबतचं वागणं काहीसं विचित्र होतं आणि अपराधीपणामुळे त्या सामाजिक गोष्टींपासून दूर राहतात. अशीही काही प्रकरणं होती ज्यात बहुतांश महिला नैराश्याच्या बळी ठरल्या होत्या.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अशा वेळी खोटं बोलल्यामुळे श्वासाचा वेग वाढणं, प्रत्येक गोष्टीवर जास्त स्पष्टीकरण देणं, मुलांचे जास्त लाड करणं आणि पतीला जास्त आदर देण्याचा प्रयत्न त्या करतात. असं का झालं हे त्या मनातल्या मनात स्वतःलाच वारंवार समजावतात. नवरा चांगला असेल तर त्या वारंवार स्वतःला दोष देतात. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक निघून जाते. त्या वारंवार फोन चेक करून मेसेज डिलीट करत राहतात. ज्या पुरुषासोबत प्रेम किंवा अनैतिक संबंध असतात, त्याचा फोन नंबर मैत्रिणीच्या नावाने सेव्ह करतात. रात्रीच्या वेळी शांत झोपू शकत नाहीत. असे संबंध संपुष्टात आणण्याचा विचार त्यांच्या मनात सारखा येतो; पण भावूक होऊन अशा स्त्रिया पुन्हा त्याच चक्रात अडकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात