मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाथरूममध्ये नवरा काढत होता विचित्र विचित्र आवाज; दरवाजा उघडताच बायकोला बसला 'जोर का झटका'

बाथरूममध्ये नवरा काढत होता विचित्र विचित्र आवाज; दरवाजा उघडताच बायकोला बसला 'जोर का झटका'

नवऱ्याचा प्रताप पाहून बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली.

नवऱ्याचा प्रताप पाहून बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली.

नवऱ्याचा प्रताप पाहून बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली.

    कॅनबेरा, 08 ऑक्टोबर : नवरा-बायकोमध्ये (Married Couple)  भांडण, संशय, लपवाछपवी असं बरंच काही घडत असतं. कधीकधी आपल्या जोडीदाराचं बदललेलं वागणं, त्याच्या हरकती हैराण करणाऱ्या असतात. त्यांच्या मागोवा घेताना असं काही समोर येतं की ज्याचा विचारही केलेला नसतो आणि मग संबंधित व्यक्तीला हा सर्वात मोठा धक्का असतो. असंच काहीसं घडलं ते ऑस्ट्रेलियातील  (Australia)  एका महिलेसोबत. तिला तिच्या (Wife) नवऱ्याचा (Husband) असं सिक्रेट समजलं ज्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेने किड्स्पॉट वेबसाईटवर आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. आपल्या नवऱ्याचा विचित्र किस्सा तिने सांगितला आहे. हा किस्सा जितका तिच्यासाठी धक्कादायक आहे, तितकाच इतरांसाठीही. महिलेने सांगितलं, लॉकडाऊनमध्ये ती आणि तिचा नवरा दोघंही घरीच होते. त्यांना कुठे बाहेर जायला मिळायचं नाही. त्यांची तिन्ही मुलंही शाळेत जात नव्हती. पूर्ण दिवस आपल्या मुलांनाच सांभाळण्यात आणि कुटुंबातील सदस्यांशी व्हिडीओ कॉलवर बोलण्यात ती वेळ घालवायची. तर नवरा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. काही कालावधीपूर्वी ते दोघं आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवायचे पण जेव्हापासून लहान मुलगा त्यांच्यासोबत झोपू लागला तेव्हा तेसुद्धा अशक्य झालं. मग नवरा रात्री उशिरापर्यंत जागायचा आणि गेम खेळायचा. त्या दोघांमधील रोमान्स संपलाच होता. हे वाचा - 'कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये...', पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर एक दिवस महिला घरातील काम करून खूप थकली आणि लवकर झोपली. रात्री दोन वाजता तिला अचानक जाग आली तेव्हा तिने पाहिलं की तिचा नवरा बेडरूममध्ये फोनचा चार्जर घ्यायला आला आहे. इतक्या रात्री नवऱ्याला चार्जरची गरज का पडली, असा प्रश्न तिला पडला. ती त्याच्यामागोमाग गेली. बाथरूममधून तिला आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला. बाथरूममध्ये नवरा कुणाशी बोलतो आहे, हा विचार करून ती हैराण झाली. तिने बाथरूमच्या दरवाजाला नीट कान लावून ऐकलं तर नवरा हे सर्व रेकॉर्ड होतं आहे का असं विचारत होता. त्यानंतर एका महिलेचा आवाज ऐकू आला. महिलेने रागात धाडकन बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आत घुसली. तिने पाहिलं तिच्या नवऱ्याने पँट काढलेली होती. त्याच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन होता. नवऱ्याला या अवस्थेत पाहताच तिला सर्व प्रकार समजला. तिचा नवरा फोनवर दुसऱ्या कुणासोबत तरी रोमान्स करत होता. तिला धक्काच बसला. ती भडकून निघून गेली. हे वाचा - Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीत अडकलं तरुणीचं डोकं नवऱ्याने तिला तो ऑफिसच्या मीटिंगमध्ये असल्याचं सांगितलं. पण भरपूर वाद झाल्यानंतर त्याने आपण त्या रात्री पहिल्यांदाच ऑनलाईन रोमान्स करत असल्याचं कबूल केलं. दोघांमधील रोमान्स खूप मिस करत आहे आणि ऑफिसचं टेन्शन दूर करण्यासाठी बायकोसोबत एकांतात वेळ मिळण्याची तो वाट पाहत असतो. पण ती वेळ देऊ शकत नाही, असं त्याने सांगितलं. पत्नीने सांगितलं, की नवऱ्याच्या उशिरापर्यंत जागण्याच्या आणि गेम खेळण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे रोमान्ससाठी ती वेळ देऊ शकत नाही. पतीने तिची माफी मागितली पण तरी ती नाराज आहे. नवरा आपल्याला फसवतो आहे. आपल्या मागे आपला नवरा खूप काही करत असेल ज्याची तिला माहिती नसेल, असं तिला वाटतं. नवऱ्याने पॉर्न पाहायला हरकत नाही पण दुसऱ्या महिलेसोबत लाइव्ह रोमान्स तिला बिलकुल सहन होणार नाही, असं ती म्हणाली. महिलेच्या या विचाराशी बरेच जण सहमत झाले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Romance, Sex, Viral, Viral news, Wife and husband

    पुढील बातम्या