Home /News /viral /

घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक

घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक

नवऱ्याचा प्रताप पाहून बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली.

    मुंबई, 19 डिसेंबर : काही कारणामुळे नवरा-बायकोला (Husband wife news) काही कालावधीसाठी एकमेकांपासून दूर राहवं लागतं. नवऱ्यापासून अशीच दूर गेलेल्या एका महिलेला तिच्या नवऱ्याबाबत असं काही समजलं की तिला धक्काच बसला. तिचा नवरा घरात एकटं असताना असं काही करायचा की ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नवऱ्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला (Cheating Husband Caught on CCTV camera). ही महिला फॅमिली ट्रिपवर गेली होती. तिचा नवरा आजारी होता त्यामुळे  तो तिच्यासोबत गेला नाही (Cheating in Relationship) तो घरात एकटाच होता. त्यानंतर महिलेने घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि तिला झटकाच बसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिचा नवरा असं काही करताना दिसला ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. हे वाचा - Shocking! पालकांनीच लेकाला दिलं सिंहाच्या जबड्यात; VIDEO पाहून नेटिझन्सचा संताप डेली स्टारच्या वेबसाईटनुसार महिलेने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महिलेने सांगितलं की ती फॅमिली ट्रिपवर गेली होती. तेव्हा आजारी म्हणून घरी एकटा राहिलेला तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत दिसला (Woman Caught Husband Kissing Another Woman). सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिनं पाहिलं की तिचा नवरा घरातील मुख्य दरवाजासमोरील एका छोट्याशा बाल्कनीत दिसत आहे. बाल्कनीतून तो खाली पाहत असतो, इतक्यात त्याच्या मागून एक महिला येते. दोघंही तिथं बराच वेळ एकमेकांना किस करतात (Door Camera Record Husband Kissing Woman). त्यानंतर महिला तिथून निघून जाते. नवऱ्याचा हा सर्व प्रताप दरवाजावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि नवऱ्याचं पितळ बायकोसमोर उघडं पडलं. हे वाचा - ज्याच्यासोबत करत होती काम तो तर...; सहकर्मचाऱ्याचं सत्य ऐकताच हादरली महिला महत्त्वाचं म्हणजे दरवाजावरील हा सीसीटीव्ही कॅमेरा तिच्या नवऱ्यानेच लावला होता आणि त्याच्यासमोर तो असं काही करत होता. त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला मूर्ख म्हणत त्याचा राज समोर येताच त्याला सोडून त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral, Viral news, Wife and husband

    पुढील बातम्या