मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! पालकांनीच पोटच्या लेकालाच दिलं सिंहाच्या जबड्यात; VIDEO पाहून नेटिझन्सचा झाला संताप

Shocking! पालकांनीच पोटच्या लेकालाच दिलं सिंहाच्या जबड्यात; VIDEO पाहून नेटिझन्सचा झाला संताप

पाळलेल्या सिंहाने चिमुकल्यावर केला खतरनाक हल्ला.

पाळलेल्या सिंहाने चिमुकल्यावर केला खतरनाक हल्ला.

पाळलेल्या सिंहाने चिमुकल्यावर केला खतरनाक हल्ला.

मुंबई, 19 डिसेंबर : आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वाघ, बिबट्या यांच्याशी झुंजणाऱ्या पालकांबाबत आपण ऐकत आलो आहोत (Wild animal attack on children video). आपला जीव धोक्यात घालून अशा भयंकर प्राण्यांशी लढा देत आई-वडील आपल्या मुलांना त्यांच्या जबड्यातून खेचून आणल्याच्या बऱ्याच बातम्या आपण पाहिल्या आहेत (Lion children video). पण पहिल्यांदाच एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात स्वतः पालकांनी आपल्या पोटच्या लेकाला चक्क सिंहाच्या जबड्यात दिलं आहे (Lion attack on children).

सिंहाने एका लहान मुलावर केलेल्या हल्ल्याचा एक खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कुत्रा-मांजर पाळावे तसं पालकांनी चक्क एका सिंहाला आपल्या घरात पाळलं. याच पाळलेल्या सिंहाने त्या घरातील लहान मुलावर संधी मिळताच हल्ला केला आहे. व्हिडीओ पाहूनच अक्षरशः अंगावर काटा येतो.

yournaturenice इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा सोफ्यावर बसला आहे. त्याला पाहून एक सिंह वेगान त्याच्या दिशेने धावत येतो आणि त्याच्या अंगावर झेपावतो.

हे वाचा - OMG! शिकार-शिकारी दोघांचाही तडफडून गेला जीव; मासा-मगरीसोबत काय घडलं पाहा VIDEO

हा प्राणी किती खतरनाक आहे, याची कल्पना कदाचित या चिमुकल्याला नाही. कारण तो 24 तास त्याच्यासोबत असतो. अगदी कुत्रा, मांजर असावं तसाच हा सिंह त्याच्यासाठी आहे. पण शेवटी सिंह तो सिंह. पाळला तरी त्याचा स्वभाव बदलेलं असं नाही. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर हा सिंह त्या मुलाची मानही आपल्या जबड्यात धरताना दिसतो. त्यावेळी काळजाचा ठोकाच चुकतो.

हे वाचा - महिला भावुक झाल्याचं दिसताच हत्तीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स संतप्त झाले आहेत. मुलाच्या पालकांची सर्वांनी चांगलीच शाळा घेतली आहे. हा सिंह कधीही या मुलाला आपली शिकार बनवेल, याबाबतही त्यांनी पालकांना सावध केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos