मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ज्याच्यासोबत करत होती काम तो तर...; सहकर्मचाऱ्याचं सत्य ऐकताच हादरली महिला

ज्याच्यासोबत करत होती काम तो तर...; सहकर्मचाऱ्याचं सत्य ऐकताच हादरली महिला

सहकर्मचाऱ्याबाबत समजताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.

सहकर्मचाऱ्याबाबत समजताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.

सहकर्मचाऱ्याबाबत समजताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.

वॉशिंग्टन, 19 डिसेंबर : काही माणसांना आपण ओळखत नसतो, त्यांना ओळखू लागल्यानंतर त्यांच्याबाबत बरंच काही समोर येतं आणि त्याचवेळी त्यांच्याबाबत असं काही समजतं ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणंही कठीण असतं. अमेरिकेतील अशाच एका महिलेला तिच्या सहकर्मचाऱ्याबाबत जे कळलं ते ऐकून तिला मोठा धक्का बसला.

एरिजोनाच्या (Arizona) फिनिक्समध्ये (Phoenix) राहणारी 51 वर्षांची सँडी सँड्रिक (Sandi Sandrik) रुग्णालयात नर्स आहे. द सन वेबसाईटशी बोलताना सँडने आपल्या आयुष्यातील धक्कादायक असा किस्सा सांगितला आहे (51 year old woman DNA Test).

सँडीने सांगितलं की ती ज्यांना आपले आई-वडिल मानते त्यांनी तिला दत्तक घेतलं होतं. तिलासुद्धा याबाबत वयाच्या 11 व्या वर्षी माहिती झाली. तिची खरी आई तिला दत्तक घेणाऱ्या तिच्या वडिलांची दूरची नातेवाईक आहे, हे तिच्या पालाकंन तिला सांगितलं. सँडीला हे ऐकून धक्काच बसला पण ती आपल्या आई-वडीलांवर इतकं प्रेम करत होती की सत्य समजल्यानंतरही तिने त्यांनाच आपलं खरं पालक मानलं.

हे वाचा - अरारारा खतरनाक! पठ्ठ्याने कमालच केली; Driving Video पाहून भलेभले पडले गार

काही वर्षांपूर्वीच सँडीच्या आई-वडीलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या खऱ्या आईने तिचा नंबर मिळवून तिला फोन केला आणि सँडीला एक सावत्र बहीण असल्याचं सांगितलं. सँडीची ही आई गॅरी नावाच्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण ती प्रेग्नंट असल्याचं समजताच तो तिला सोडून गेला.

यावेळी सँडीला तिच्या मुलांनी डीएनए टेस्ट करायला सांगितली, जेणेकरून ती गॅरीला भेटू शकेल. याच डीएनए टेस्टमार्फत कसंबसं सँडीला गॅरीचं फेसबुक प्रोफाईल सापडलं (Woman Found Biological Father’s Facebook Profile). ज्यावर ती मेसेज करत होती पण तिला रिप्लाय मिळाला नव्हता.

एक दिवस सँडी गॅरीचं फेसबुक प्रोफाईल पाहत होती तेव्हा गॅरीच्या फ्रेंड लिस्टमध्ये तिच्याच रुग्णालयातील पुरुष नर्स एलेन दिसला. सँडीने एलेनला गॅरीबाबत विचारलं तेव्हा तो त्याचा मुलगा असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकल्यानंतर सँडीच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.

हे वाचा - VIDEO - मित्रांनी नवरीला दिलं असं गिफ्ट; पाहताच नवरदेवाच्या चेहऱ्याच रंगच उडाला

एलेनने सांगितलं की तो तीन वर्षांचा असताना गॅरी त्याच्या आईला सोडून गेला होता. तेव्हा तो सँडीच्या खऱ्या आईसोबत रिलेशनशिपमध्ये आला. गॅरीने सँडीला स्वीकारण्यास नकार दिला पण सँडीच्या मते, तिचं आणि एलेनचं नातं अधिकच घट्ट झालं आहे. एलेन आणि त्याची पत्नी दोघंही सँडी आणि तिच्या कुटुंबाला भेटतात (Woman Found Lost Family Through DNA Test) .

First published:
top videos

    Tags: America, Viral, Viral news