मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आलिशान हॉटेलमधून बाहेर येताना नवरा आणि गर्लफ्रेंडला बायकोनं पाहिलं आणि मग...

आलिशान हॉटेलमधून बाहेर येताना नवरा आणि गर्लफ्रेंडला बायकोनं पाहिलं आणि मग...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पीडितेने सांगितले की, तिने 22 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं देखील आहे, जे आता कॉलेजला जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Devika Shinde

नवी दिल्ली 29 सप्टेंबर : प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की, त्याच्या बायकोने त्याचं घर, त्याचे आई-वडिल आणि मुलांना सांभाळवं. तसेच आपल्या नवऱ्याची सेवा करावी. तसेच विवाहानंतर महिलेची देखील आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा असते की, त्याने तिच्यासोबत प्रेमाचे चार शब्द बोलावेत, तिला फारायला घेऊ जावं. तसेच तिच्याशी एकनिष्ठ राहावं.

पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की, लग्नानंतर देखील अनेक पुरुषांचे किंवा महिलांचं बाहेर अफेर असतं. ज्याचा परिणाम कधी-कधी फारच भयानक असतो. सध्या असंच एक प्रकरण दिल्लीतील कॅनॉट प्लेसजवळ घडली.

खरंतर येथे एका बायकोने आपल्या नवर्याला एका महिलेसोबत एका लक्झरी हॉटेलमधून बाहेर येताना पाहिलं आणि त्यानंतर सुरु झाला त्यांचा कौटुंबिक वाद.

हे वाचा : नवरीला न घेताच नवऱ्यानं काढला पळ, चर्चेत आलं बिहारमधलं अजब-गजब Love, पाहा Video

खरंतर अशोका रोडवरील एका लक्झरी हॉटेलच्या लॉबीमध्ये एका ४५ वर्षीय महिलेनं तिचा नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

पीडितेने सांगितले की, तिने 22 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं देखील आहे, जे आता कॉलेजला जातात. तिच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उत्तर दिल्लीतील रहिवासी असलेल्या पीडितेने सांगितले की, 20 सप्टेंबर रोजी ती तिच्या मैत्रिणीसोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये कॉफी घेत होती, तेव्हा तिने तिचा बिझनेसमॅन नवरा आणि त्याच्या मैत्रिणीला लिफ्टमधून बाहेर पडताना पाहिलं.

ती म्हणाली “मला पाहताच तो परत गेला पण नंतर पुन्हा बाहेर आला. काही सेकंदांनंतर त्याची गर्लफ्रेंड देखील बाहेर आली आणि मी तिचा पाठलाग केला. ती हॉटेल सोडू लागली आणि मी बाहेर तिच्या मागे गेले. दरम्यान, माझा नवरा तेथे आला आणि त्याने सांगितले की ती फक्त माझ्या ऑफिसची एम्पलॉयी आहे."

हे वाचा : साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा... Video Viral

पीडितेने सांगितले की, "पण जेव्हा मी ऐकले नाही आणि त्या महिलेचा पाठलाग केला, तेव्हा तिने मला मारहाण करायला सुरु केलं, मला काहीही अपशब्द ती महिला वापरु लागली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या महिलेला थांबवण्या ऐवजी माझा नवरा माझ्याशी भांडू लागला आणि मला कानाखाली देखील बजावली. ऐवढंच नाही तर माझी मैत्रीण जेव्हा मध्ये आली तेव्हा तिला देखील या दोघांनी धक्काबुक्की केली. ''

हे सगळं लोक पाहात होते, पण कोणीही त्यांच्या मदतीला गेलं नाही, अखेर महिलेनं पोलीसांना फोन लावला आणि तिचा नवरा आणि गर्लफ्रेंडला देखील तेथून हलू दिलं नाही, अखेर पोलीस त्या तिघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि पडितेचं स्टेटमेंट घेऊन त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आता पोलीस या प्रकरणाची तपासणी करत आहेत. नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी नोटीस देखील बजावली आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Viral news