बिहार 27 सप्टेंबर : लग्न ही प्रत्येक तरुण तरुणीच्या आयुष्यातील मोठा टप्पा आहे, कारण यानंतर ते दोघंही नव्या आयुष्याची सुरुवात करतात. म्हणूनच तर लग्नाच्यावेळी सगळं काही चांगलं असावं आणि प्रत्येकाला आपलं लग्न लक्षात राहावं असं जोडप्याला वाटत असतं. त्यासाठी ते खूप खर्च देखील करतात. तसेच हे क्षण कॅमेरात कैद करतात, जेणे करुन त्यांना भविष्यात कधीही आठवण झाली तरी देखील ते हा व्हिडीओ पाहू शकतात. सध्या असाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आता उपस्थीत पाहूणेच काय तर नेटकऱ्यांच्या देखील चांगलंच लक्षात राहिल. तसे पाहाता हे लग्न काही संपन्न झालं नाही, पण त्या पूर्वीच अशी काही गोष्ट घडली की आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. खरंतर हा व्हिडीओ बिहारचा आहे. जेथे एक नवरा कोर्ट मॅरेज करताना त्याला मध्येच सोडून पळून जातो. हे ही वाचा : तुम्हाला पायही ठेवावासा वाटणार नाही, अशा ठिकाणी नवरीबाईने हौशीने केलं फोटोशूट; पाहा VIDEO हो, तुम्हाला विश्वास बसत नाहीय ना? मग हा व्हिडीओ पाहा
या व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की, एक तरुणा रस्त्यावर पळत आहे आणि त्याच्यामागे काही लोक आणि लाल साडीत एक महिला पळत आहे. खरंतर कोर्ट मॅरेज करण्यासाठी कोर्टात आलेला नवरा अचानक तेथून पळून गेला, तेव्हा त्याची होणारी बायको, त्याच्या मागे मागे पळू लागली. आता नक्की असं का घडलं? किंवा नवरदेव असं करण्यामागचं कारण समोर आलेलं नाही, परंतू हा तरुण लग्न करण्यासाठी कोर्टात आला आणि नंतर पळून गेला, यावरुन तरी असे दिसत आहे की कदाचित कोर्टात आल्यावर पैसे किंवा इतक गोष्टींवरुन त्यांच्यात वाद झाला असावा, ज्यामुळे तो अचानक पळून गेला. हे ही वाचा : ‘‘मैने पायल है छानकाई’’ गाण्यावर सुंदर महिलेनं धरला ताल, डान्स असा की नेटकऱ्यांनाही लावलं वेड, पाहा VIDEO या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. लोक या व्हिडीओ शेअर देखील करत आहे. ज्यामुळे बिहारमधील ही साधं लग्न देशभरात प्रसिद्ध झालं आहे.