मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजबच! पती-पत्नीने एकमेकांसाठी बनवले विचित्र नियम; ऐकूनच भडकले नेटकरी

अजबच! पती-पत्नीने एकमेकांसाठी बनवले विचित्र नियम; ऐकूनच भडकले नेटकरी

या कपलच्या लग्नाला अनेक वर्ष झाले आहेत आणि त्यांना चार मुलंही आहेत. मात्र तरीही आपलं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू राहावं, यासाठी त्यांनी हे नियम बनवले आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 जानेवारी : लग्नाचं (Marriage) नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. अशात या दोन्हीतलं काहीही कमी झालं की हे नातं अडचणीत येतं. अशाच एका कपलने आपलं लग्न टिकवण्यासाठी काही कडक नियम बनवले आहेत (Weird Rules for Partner). ज्याचं दोघांनाही पालन करावं लागतं. त्यांच्या या नियमांना अनेकांनी चुकीचं ठरवलं आहे, मात्र याचा या जोडप्याला काहीच फरक पडत नाही.

दरीच्या कडेला उभा राहून मित्राला देत होता झोका; पाय घसरला अन्..., Shocking Video

या कपलचं नवीन लग्न झालं असून लग्नाचं नातं कायम ठेवण्यासाठी ते काहीतरी प्रय़ोग करत आहेत, असं अजिबातही नाही. तर या कपलच्या लग्नाला अनेक वर्ष झाले आहेत आणि त्यांना चार मुलंही आहेत. मात्र तरीही आपलं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू राहावं, यासाठी त्यांनी हे नियम बनवले आहेत.

टिकटॉकवर आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना मॅडिसन शावेजने सांगितलं की त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यासाठी असे काही नियम बनवले आहेत, जे ऐकून इतरांना राग येऊ शकतो. या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की आपलं लोकेशन ऑन केल्याशिवाय पती-पत्नी यांच्यातील कोणीही घरातून बाहेर पडू शकत नाही. बाहेर जाताना त्यांना कधीही लोकेशन ऑफ ठेवण्याची परवानगी नाही. दोघांमधील कोणीही इंटरनेटवर आक्षेपार्ह कंटेंट पाहू शकत नाही. आपल्या आयुष्यात एकमेकांपेक्षा अधिक महत्त्व त्यांनी कोणालाच द्यायचं नाही.

नवरदेवाला मिळाली मित्रांच्या चुकीची शिक्षा; होणाऱ्या पत्नीने दिला लग्नास नकार

या नियमांबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एका यूजरने लोकेशनबद्दल बोलत म्हटलं की हे ऐकून मी थक्क झालोय. हा पूर्णपणे वेडेपणा आहे. दोघांना एकमेकांवर विश्वास नाही. मात्र मॅडिसन सांगते, की आम्ही आमचं लोकेशन यासाठी ऑन ठेवतो कारण आम्हाला एकमेकांच्या सुरक्षेची काळजी आहे. एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं की जर हे तुमच्या आयुष्यासाठी ठीक असेल तर तुम्ही काहीही विचार न करता हे करू शकता.

First published:

Tags: Couple, Viral news