Home /News /viral /

दरीच्या कडेला उभा राहून मित्राला देत होता झोका; अचानक पाय घसरला अन्..., थरकाप उडवणारा VIDEO

दरीच्या कडेला उभा राहून मित्राला देत होता झोका; अचानक पाय घसरला अन्..., थरकाप उडवणारा VIDEO

एक अतिशय धोकादायक ठिकाणी झोका खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे.

  नवी दिल्ली 02 जानेवारी : लहानपणी तुम्ही अनेकदा झोका खेळला असाल. झोका एका बाजूने धक्का देताच दुसऱ्या बाजूला हवेतूनच अगदी वेगात जातो, तेव्हा सर्वांनाच मजा येते. झोका खेळणं फक्त लहान मुलांनाच आवडतं असंही काही नाही. अनेकदा मोठ्या माणसांनाही झोका खेळण्याची आवड असते, मग वय कितीही असो. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात वृद्ध व्यक्ती झोका खेळताना दिसतात. आजकालच्या काळात लोकांना काहीतरी वेगळं करण्याचा आणि स्वतःच्याच जीवाशी खेळण्याचाही भलताच छंद आहे. सध्या असाच एक अतिशय धोकादायक ठिकाणी झोका खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; तिला आनंदी ठेवायला करतो हे काम हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल, सोबतच तुम्हाला भीतीही वाटेल. यात दिसतं की एक व्यक्ती आपल्या मित्राला झोका देण्याच्या नादात अगदी मृत्यूच्या दारात पोहोचला, मात्र सुदैवाने तो वाचला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शका की एक व्यक्ती आपल्या मित्राला झोका देत आहे. हा झोका एका खोल दरीच्या कडेला आहे. यातील एक मित्र झोका पुढे ढकलताना दिसतो, जेणेकरून त्याच्या मित्राला झोक्याची पुरेपूर मजा घेता यावी. मात्र इतक्यात त्याचा पाय झोक्यात अडकतो आणि तो घसरत काठापर्यंत पोहोचतो. परंतु सुदैवाने त्याचा पाय झोक्याच्या दोरीतच अडकतो आणि तो दरीत पडण्यासाठी पोहोचतो.
  या व्यक्तीचा पाय दोरीत अडकला नसता तर तो दरीत कोसळला असता. यात त्याचा जीवही जाऊ शकत होता. हैराण करणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर socialstarofficial नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 24.8 मिलियन म्हणजेच 3 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 8 लाख 40 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. रोड अपघातानंतर ट्रक चालकाला झाली 110 वर्षाची शिक्षा; पुढे प्रकरणाला भलतंच वळण अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, नशीब चांगलं होतं. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, सुदैवाने जीव वाचला. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या