मराठी बातम्या /बातम्या /Viral /रावणाची पत्नी मंदोदरी खरंच सीतेची आई होती? काही पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात उल्लेख

रावणाची पत्नी मंदोदरी खरंच सीतेची आई होती? काही पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात उल्लेख

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

सिता आणि रावणाची बायको मंदोदरी यांच्यात नक्की कोणतं नातं होतं? सिता खरंच मंदोदरीची मुलगी होती काय? इतिहासात काय म्हटलं, जाणून घ्या

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : उत्तर रामायण, अद्भुत रामायण आणि इतर अनेक भाषांमधल्या रामायणाशी संबंधित ग्रंथांमध्ये मंदोदरी ही सीतेची आई असल्याचे उल्लेख आहेत. असं म्हटलं जातं, की जनक राजाला शेत नांगरताना जी मुलगी सापडली ती खरं तर मंदोदरी आणि रावणाने जमिनीत पुरली होती.

    1 : वाल्मिकी रामायणात मंदोदरीची कथा नाही. परंतु, उत्तर रामायणात मंदोदरीचं सौंदर्य आणि तिच्या सच्चेपणाचा उल्लेख सापडतो. रामायणाच्या इतर अनेक आवृत्त्यांमध्ये मंदोदरीविषयी तपशीलवार माहिती लिहिलेली आहे. अद्भुत रामायणात मंदोदरी ही सीतेची आई असल्याचं म्हटलं आहे. यामागे एक कथाही सांगितली आहे. अद्भुत रामायणातील कथेनुसार, रावण एका मोठ्या कुंडात साधूंचं रक्त गोळा करत असे.

    2 : मंदोदरीला हा प्रकार कळताच तिला राग आला. रक्ताने भरलेल्या त्याच कुंडात जीव देण्याचं तिनं ठरवलं. साधूंच्या रक्ताने भरलेलं हे कुंड अत्यंत विषारी होतं. मंदोदरीने आत्महत्येच्या इराद्याने त्या कुंडात उडी मारली; पण तिचा मृत्यू होण्याऐवजी ती गर्भवती राहिली. यामागे एक कारण होतं. या कुंडात दुधाचं एक भांडं होतं. ते एका ऋषींनी अभिमंत्रित केलेलं होतं.

    मेलेल्या माणसाला काय जाणवतं माहितीय? सत्य ऐकून उडेल चेहऱ्याचा रंग

    3 : त्यानंतरही मंदोदरीचा राग शांत झाला नाही. तिने भावी मुलीला कलंक समजून कुरूक्षेत्रातल्या जमिनीत पुरले. हे ते ठिकाण होतं, जिथे जनक राजाला शेतजमीन नांगरताना बाल सीता मिळाली होती.

    4 : मंदोदरीच्या सौंदर्याने मोहित झालेल्या रावणाने तिच्याशी लग्न करण्याचा विचार केला, तेव्हा त्याला इशारा देण्यात आला की जन्मलेलं पहिलं अपत्य त्याच्या नाशाचं कारण ठरेल, असा उल्लेख देवी भागवत पुराणात आहे; मात्र रावणाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून मंदोदरीशी विवाह केला. नंतर तिच्या पोटी जन्मलेल्या पहिल्या अपत्याला स्वतः रावणाने कुरुक्षेत्रातल्या जमिनीत गाडले. ही बालिका सीता बनली आणि रावणाच्या वधाचं कारण ठरली.

    5 : रामायणाची जैन आवृत्ती असलेल्या वासुदेव हिंदी आणि उत्तर पुराणात अशाच प्रसंगाचा उल्लेख आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे, की सीता हे रावण आणि मंदोदरीचं पहिलं अपत्य होतं आणि रावणाला त्याच्या मृत्यूची भीती वाटल्यामुळे त्याने तिला पुरलं. आशियातल्या इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह अनेक देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मलय भाषेत लिहिलेल्या सेरी राम या रामायणातही सीतेबद्दल असेच उल्लेख आढळतात.

    6 : आनंद रामायणानुसार, पद्माक्ष राजाला पद्मा नावाची मुलगी होती. ती देवी लक्ष्मीचा अवतार होती. तिच्या विवाहसोहळ्याचं आयोजन केल्यावर राक्षस तिच्या वडिलांना मारून टाकतात. दुःखी झालेली पद्मा आगीत उडी मारते. रावणाला तिचं पाच रत्नांमध्ये रूपांतरित झालेलं शरीर सापडतं. तो तिला एका पेटीत बंद करून लंकेला घेऊन जातो. मंदोदरी ही पेटी उघडते आणि पाहते तर आत पद्मा असते.

    7: मंदोदरी तिच्या पतीला ही पेटी तिच्यापासून दूर नेण्याचा सल्ला देते. दुसरीकडे पद्मा रावणाला `मी पुन्हा लंकेत येईन आणि तुझ्या मृत्यूचं कारण ठरीन,` असा शाप देते. यामुळे घाबरलेला रावण ती पेटी जनकनगरात पुरून टाकतो; पण जनक राजाला पद्मा सापडते.

    First published:
    top videos

      Tags: Ayodhya Ram Mandir, History, Ram, Shocking, Social media, Top trending, Viral