मराठी बातम्या /बातम्या /Viral /मेलेल्या माणसाला काय जाणवतं माहितीय? सत्य ऐकून उडेल चेहऱ्याचा रंग

मेलेल्या माणसाला काय जाणवतं माहितीय? सत्य ऐकून उडेल चेहऱ्याचा रंग

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

वर्चुअर रिएलिटीमध्ये मरण माणसासाठी काय असेल? हे कल्पना शक्तिच्या पलिकडले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : आपण बऱ्याचदा लोकांना हे बोलताना ऐकलं असेल की मेल्यानंतर माणूस स्वर्गात जातो किंवा वाईट काम केलं तर नरकात जागा मिळते, जिथे माणसाला खुप जास्त वेदना सहन कराव्या लागतात. असं असलं तरी मरायचं कोणालाच नसतो, जो तो आपण आणखी कसं जगू आणि चांगलं आयुष्य जगू यासाठी धडपड करत राहातो. पण विधिचा एक नियम आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीला कधी ना कधी मरायचंच आहे. पण कधी विचार केलाय मृत्यूनंतर माणसाचं काय होत असेल?

    वर्चुअर रिएलिटीमध्ये मरण माणसासाठी काय असेल?

    शॉन ग्लॅडवेल नावाच्या एका कलाकाराने पासिंग इलेक्ट्रिकल स्टॉर्म्स नावाचे एक प्रदर्शन तयार केले आहे, जे लोकांना मरताना काय वाटते हे जवळून दाखवत आहे.

    अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?

    यासाठी तुम्हाला तात्पुरत्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपावे लागेल. तेव्हा तुमच्यावर हा प्रयोग केला जातो की मेल्यानंतर माणसाला कसे वाटते. हा सगळा अनुभव घेत असताना ते कर्मचारी तुम्‍हाला बाहेर काढू शकतात. कारण काहींसाठी ते जास्त काळ सुरू ठेवणे धोकादायक ठरु शकते.

    मेलबर्नचे मूळ आणि प्रदर्शक मार्कस क्रुक यांनी आभासी वास्तवात (वर्चुअल रिएलिटीमध्ये) मरणे काय असते याचे वर्णन केले आहे. Tiktok वर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, "मी हे पाहिलं आहे की हे कलाकार लोक हे सगळं कसं करतात. जे पाहून खरोखरच तुम्हाला चिंता वाटेल आणि आश्चर्य नक्कीच होईल.''

    पुढे ते म्हणाले, "तुमचे बोट हार्ट रेट मॉनिटरवर ठेवतात आणि मग तुम्हाला तुमचा हात वर करायला सांगतात."

    आभासी वास्तव किंवा वर्चुअल रिएलिटीहा मृत्यूचा जवळचा अनुभव आहे, जो स्वतः प्रयत्न करणार्‍यांशिवाय कोणालाही समजू शकत नाही. याचा अनुभव ऑस्ट्रेलियामध्ये दिला जातो. पण ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की, शरीराला सोडून आत्मा हवेत रंगतोय असा भास होतो. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral