मुंबई, 09 मे : सिनेमात किंवा टिव्हीत तुम्ही बऱ्याचदा हे पाहिलं असेल की किन्नरांचा धर्म हा मुस्लिम असल्याचे दाखवले आहे. पण कधी तुम्ही असा विचार केलाय का की, किन्नर मुस्लिम का असतात किंवा मग त्यांना मुस्लिम धर्म का स्वीकारावं लागतो? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल. मुघल काळात मोठ्या संख्येने लोकांना धर्म बदलण्यास भाग पाडले गेले, तेच किन्नरांच्या बाबतीत देखील घडले. अनेक किन्नरांना हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले. मात्र, मुघल राजवटीत किन्नरांचं खूप महत्व होतं. तेथे किन्नरांना मोठमोठ्या पदांवर नोकरी दिली जात होती. अगदी राजांच्या हरममध्ये देखील त्यांना मोठं पद मिळायचं, ज्यामुळे त्यांना खूप पैसा मिळत असे. खरंतर किन्नरांचे शौर्य, त्याग आणि समर्पण पाहून मुस्लिम राज्यकर्ते प्रभावित झाले. त्यांना त्यांच्यापासून धोकाही दिसत नव्हता. त्यामुळे हे राजे किन्नरांना त्याकाळी आपला विश्वासू मानत असे आणि याच कारणामुळे त्यांच्यावर महत्त्वाची कामे सोपवण्यात आली होती. राणी आणि हरमच्या सुरक्षेसाठी किन्नर काम करायचे. कधी विचार केलाय, खोल पाण्यात पूल कसा बांधला जातो? यामागचं कारण म्हणजे हरममध्ये राजाशिवाय कोणत्याही पुरुषाला एन्ट्रि नव्हती. तसेच किन्नरांसोबत राणी शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हते. त्यामुळे राजा त्यांना आपल्या हरममध्ये पद देत असतं. शिवाय किन्नर शक्तिशाली असल्याने ते राण्यांचे रक्षण देखील करु शकत होते. किन्नर हे नेहमी हरममध्ये राण्यांसोबत असायचे. राण्यांची सोवा करण्यापासून ते नाच-गाण्यापर्यंत ते राण्यांचे मनोरंजन करायचे. मुस्लिम राजवटीत राण्यांची काळजी घेण्यासोबतच राजदरबारातही किन्नरांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. अनेक किन्नर राज्यकर्त्यांच्या जवळचे होते. त्यांचा अधिकारही खूप होता. उलट त्यांना लष्करातही प्रभावी पदे देण्यात आली. ब्रिटिश आले तेव्हा अनेक किन्नरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पण आता हिंदूबहुल देशातही बहुतांश किन्नर हे मुस्लिम बनतात. कधी कैद्यांवर कुत्र्याची उल्टी तर कधी रेप; इतिहासातील सर्वात क्रुर महिलेबद्दल तुम्हाला माहितीय का? पत्रकार शरद द्विवेदी यांच्या ‘किन्नर अबुझ मिस्ट्रियस लाइफ’ या संशोधन पुस्तकात म्हटले आहे की, किन्नर मोठ्या प्रमाणात पैसे देऊन मौलवी आणि इमामांकडून धर्मांतर करतात. याचे कारण हे कधीकधी नाईलाज तर कधी काही मान्यता असल्याचे समोर आले. किन्नरांना त्याच्या संपूर्ण आयुष्यात लोकांकडू त्रास, छळच मिळाला. तसेच त्यांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले जाते, त्यामुळे त्यांना पुढील जन्म कोणत्याही परिस्थितीत किन्नर म्हणून घ्यायचा नसतो. तसेच हिंदू धर्माच्या समजूतीनुसार माणसाचा पूनर्जन्म होतो. त्यामुळे ते मुस्लिम धर्म सिवीकारतात. ज्यामुळे त्यांना पून्हा किन्नर म्हणून जन्म मिळणार नाही. याचे एक कारण हे देखील आहे की, किन्नर समाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे सर्व किन्नर हे मुस्लिम आहेत आणि ते श्रीमंत आहेत. त्यांच्या जवळ जाण्यासाठी आणि त्यांचा शिष्य बनण्यासाठी मग हे किन्नर आपला धर्मही बदलतात. ही व्यवस्था आणि समजूत बदलण्यासाठी अनेक हिंदू किन्नर धडपडत आहेत. यामुळे त्यांनी हिंदू धर्मालाही आखाडा बनवला आहे. ज्याचे महामंडलेश्वर हिंदू आहेत, त्यामुळे या धर्मपरिवर्तनाची परिस्थिती बदलत आहे पण त्यासाठी थोडा वेळ नक्की लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.