मुंबई, 09 मे : तंत्रज्ञानामुळे लोकांचं आयुष्य सोपं आणि सोयीचं झालं आहे. हे तर आपण सगळेच जाणतो. तंत्रज्ञानाने एका शहरापासून दुसऱ्या शहराचे अंतरही कमी केले आहे. ते ब्रिज किंवा पुलाचा मदतीनं शक्य झालं आहे. शिवाय गावाकडे देखील नदी ओलांडण्यासाठी ब्रिज फायद्याचा ठरला आहे. शिवाय काही असे पुल देखील असतात जे समुद्रावर बांधले गेलेले आहेत. तुम्ही असे पुल अनेक ठिकाणी पाहिले असणार. पण कधी विचार केलाय का की हे पुल कसे बांधले जातात? यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग, पाण्याखालील माती किती आहे, पुलाचे एकूण वजन, खोली आणि त्यावरून धावणाऱ्या वाहनांसह वजन यावर संशोधन केले जाते. इतके संशोधन करूनच काम सुरू होते. Weird : जगातील असं गाव जिथे कार-बाईक नाही, तर फक्त बोट विकत घेतात लोक तसे पाहाता नद्या आणि समुद्रावर 3 प्रकारचे पूल बांधले आहेत. यामध्ये झुलता पूल, तुळई पूल आणि कमान पूल यांचा समावेश आहे. खोल पाण्यावर पूल कसे बांधले जातात? नद्या आणि समुद्रावर बांधण्यात येणाऱ्या पुलांचे बहुतांश साहित्य आधीच तयार केले जाते. ज्यानंतर ते इंस्टॉल केले जातात. सिव्हिल इंजिनीअरिंगच्या भाषेत याला प्री-कास्ट स्लॅब म्हणतात. त्यांना जोडूनच पूल बनवला जातो. पण जे खांब आहेत ते जागेवरच तयार केले जातात. सर्वप्रथम या पुलांची पायाभरणीही केली जाते आणि त्यानंतर वरील काम केले जाते. अशा प्रकारे नद्यांमध्ये कॉफरडॅम टाकले जातात या खांबांचा पाया घालण्याच्या प्रक्रियेत, कोफर्डम प्रथम ठेवले जाते. कोफर्डम हा एक मोठा लोखंडी ड्रम आहे जो खांब ज्या ठिकाणी बसवायचा आहे तिथे ठेवलेला आहे. हा एक साचा आहे यामुळे पाण्याचे नियंत्रण होते. गरजेनुसार त्यांचा आकार गोल किंवा चौकोनी ठेवता येतो. त्यांचा आकार लांबी, रुंदी, पाण्याची खोली आणि पाण्याचा प्रवाह या आधारे ठरवला जातो. पाया भरणीच्या कामालाच सर्वात जास्त वेळ लागतो. कधी विचार केलाय बँकवाले चेकच्या मागे सही का करायला सांगतात? कॉफर्डॅम कसे कार्य करतात? कोफर्डम ठेवल्यानंतर त्याच्या आजूबाजूला पाणी राहाते पण त्याच्या आत पाणी जात नाही. कॉफरडॅम पाण्यात टाकताना त्याच्या आत भरलेले पाणी पाईपद्वारे बाहेर काढले जाते. त्याच्याखाली माती दिसू लागली की, मग काम सुरू होते. त्यानंतर अभियंते सिमेंट, काँक्रीट आणि बारच्या मदतीने मजबूत खांब तयार करतात. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तयार केलेल्या पुलाचे प्री-कास्ट स्लॅब आणून खांबांवर बसवले जातात. अशाप्रकारे हळूहळू पण एकदम मजबूत पुल तयार केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.