जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Google Map येणारा महिलेचा आवाज नक्की कोणाचा? कधी असा प्रश्न पडलाय का?

Google Map येणारा महिलेचा आवाज नक्की कोणाचा? कधी असा प्रश्न पडलाय का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुगल मॅपमध्ये बोलत असलेल्या या महिलेचा आवाज अनेकांना आवडतो, खूप गोड असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण या गुगल मॅपमध्ये बोलणारी महिला कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : आजकाल लोकांना कुठेही अनोळखी ठिकाणी जायचं असलं तर ते गुगलवर रस्ता शोधतात आणि आपल्या ठिकाणावर पोहोचतात. अशावेळी आपल्याला एक महिला सगळ्या गोष्टीसाठी गाईड करत असते. ही महिला आपल्याला उजवीकडे वळा, डावीकडे वळा असं गाईड करत असते. पण कधी विचार केलाय का की हा आवाज कोणाचा असावा? गुगल मॅपमध्ये बोलत असलेल्या या महिलेचा आवाज अनेकांना आवडतो, खूप गोड असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण या गुगल मॅपमध्ये बोलणारी महिला कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तिचे नाव काय आणि ती काय करते? चला या महिलेबद्दल सविस्तर जाणून घेऊ. जगातील एकमेव ठिकाण जिथे होतो 5 नद्यांचा संगम, कुठे आहे ही जागा? वास्तविक, गुगल मॅपवर ज्या महिलेचा आवाज ऐकू येतो तिचे नाव कॅरेन जेकबसेन आहे. तिचे पूर्ण नाव कॅरेन एलिझाबेथ जेकबसेन आहे. ती मूळची ऑस्ट्रेलियन असून सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. कॅरेन व्यवसायाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, गायक, संगीतकार आणि इन्फ्लुएन्सर आहे. केरन यांना अनेक प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

आता तिचा आवाज गुगल मॅपद्वारे जगातील अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच 2011 ते 2014 या काळातील ऍपल आयफोन, आयपॉड आणि आयपॅडवरील सिरी ऍप्लिकेशनमध्ये कॅरेन जेकबसेनचा आवाज वापरण्यात आला होता. एक महिला एंटरटेनर असल्याने तिने तिचे अनेक ‘वन वुमन’ शो सादर केले आहेत. द ट्रायड, द लॉरी बीचमन थिएटर आणि द पब्लिक थिएटर, द डुप्लेक्स आणि द बिटर एंड असं या शोचं नाव आहे. केरेन यांनी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ज्याचे नाव रिकॅल्क्युलेट आहे - ड्रायव्हिंग परफॉर्मन्स सक्सेससाठी दिशानिर्देश आणि तुमच्या भविष्यासाठी GPS गर्ल्स रोड मॅप. कॅरेनने डॉसन क्रीकसाठी साउंडट्रॅक देखील तयार केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात