नवी दिल्ली 08 फेब्रुवारी : जंगलातील निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी जंगल सफारी (Jungle Safari) हा उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्हाला वन्य प्राण्यांनाही जवळून पाहता येतं. पण जरा कल्पना करा, तुम्ही सफारी राईडवर आहात आणि ‘जंगलाचा राजा’ सिंह तुमच्या जवळ आला तर तुम्ही काय कराल? नक्कीच तिथे असलेल्या सर्वांचीच घाबरगुंडी उडेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Viral Video of Lion) होत आहे. यात एक सिंह पर्यटकांच्या गाडीच्या अगदी जवळ जातो. यानंतर पर्यटकांसोबतच गार्ड्सची अवस्थाही बिकट होते. यानंतर पुढे काय घडलं, ते तुम्ही व्हिडिओमध्येच पाहा. बसमध्ये सीट मिळवण्यासाठी कपलचा विचित्र जुगाड; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की जंगल सफारीदरम्यान काही पर्यटक रस्त्यावर उभा गाडीमध्ये बसलेले असतात. इतक्यात एक सिंह त्यांच्या गाडीच्या अगदी जवळ आला. हे दृश्य खरंच काळजाचा ठोका चुकवणारं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेकर्स सीटवर बसलेला व्यक्ती सिंहाला पाहून अतिशय घाबरतो. सिंह तिथे आल्यावर कोणीच आपल्या सीटवरुन हालचाल करत नाही. कदाचित त्यांना सिंहाला आपण इथे आहोत, हे समजू द्यायचं नाही.
जंगल सफारीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर richard.degouveia नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ट्रेकर्स सिटवर तुम्हाला कसं वाटेल? सबीसाबी रिझर्वच्या प्राण्यांना पिढ्यांपासून सवय आहे की ते आपल्या आसपास असलेल्या उपस्थितांकडे लक्ष देत नाहीत. असंही म्हणू शकता की इथे जगातील सर्वात अविश्वसनीय खेळ पाहायला मिळतो. चिमुकली रस्ता ओलांडत असतानाच वेगात आली कार अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO हा व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली, सिंह माणसांच्या जवळ येऊन उभा राहिलेला तेव्हा माझा तर श्वासच थांबला होता. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, कदाचित सिंहाने नुकतीच शिकार केली असावी आणि त्याला भूक नसेल. नाहीतर त्याने कोणालाही मिनिटात संपवलं असतं. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे.