मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकली रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगाने आली कार अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चिमुकली रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगाने आली कार अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

स्कूलबाहेर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल (Woman Cop Save a Girl Video Viral) होत आहे.

स्कूलबाहेर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल (Woman Cop Save a Girl Video Viral) होत आहे.

स्कूलबाहेर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल (Woman Cop Save a Girl Video Viral) होत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 08 फेब्रुवारी : जेव्हा देव स्वतः मनुष्याचं रक्षण करण्यास सक्षम नसतो तेव्हा तो आपले दूत पाठवतो, असं म्हटलं जातं. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी देवासारखी प्रकट झाली. असे लोक जीवाची पर्वा न करताही इतरांना मदत करतात. नुकतंच असंच दृश्य अमेरिकेतील रस्त्यावर पाहायला मिळालं. जेव्हा एका महिला पोलिसाने चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही (Woman Police Saved a Student from Accident). 'चूक कोणाची'? अपघाताचा हा विचित्र VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न अमेरिकेतील मेरीलँडमध्ये नॉर्थ ईस्ट मिडल स्कूलबाहेर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल (Woman Cop Save a Girl Video Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक शाळकरी मुलगी रस्ता ओलांडत आहे. इतक्यात अचानक एक भरधाव कार तिच्या दिशेनं आली. तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे उभी असलेली एक महिला पोलीस लगेचच पुढे आली आणि त्या मुलीला गाडीच्या समोरून बाजूला ढकलून दिलं (Woman Police Saved a Child from Being Hit by a Car). द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला पोलिसाचं नाव अॅनेट गुडइयर असून ती नॉर्थ ईस्ट पोलीस विभागाची कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅनेट 14 वर्षांपासून क्रॉसिंग गार्ड म्हणून काम करत आहे. तिने आपल्या आयुष्यात अशी घटना यापूर्वी कधीही पाहिली नसल्याचं सांगितलं. व्हिडिओमध्ये दिसतं की, रस्त्यावर खूप पाणी साचलं आहे, यावरुन जाणवतं की त्या दिवशी पाऊस पडला होता. परंतु असं असूनही कारचा वेग जास्त होता, त्यामुळे चालकाला वेळीच ब्रेक मारता आला नाही.

'कोरोना तू जाता जाता...',लतादीदींच्या निधनानंतर Anand Mahindra यांचं भावुक ट्विट

गुडइयरने सांगितलं की, मुलीला वाचवल्यानंतर तिलाच विश्वास बसत नव्हता की आताच असा काही प्रकार घडला आहे. त्या म्हणाल्या की मी स्वतः देखील एक आई आहे, त्यामुळे मुलांना वाचवणं ही माझी पहिली प्राथमिकता आहे. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून परतल्यानंतर त्या या मुलीला पाहण्यासाठी प्रथम तिच्या शाळेत पोहोचल्या. मुलगी आणि तिचे वडील दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी अॅनेटचे आभार मानले. सोशल मीडियावर लोकांनी महिलेला हिरो म्हणत तिचं कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Road accident, Shocking video viral

पुढील बातम्या