जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बसमध्ये सीट मिळवण्यासाठी कपलचा विचित्र जुगाड; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

बसमध्ये सीट मिळवण्यासाठी कपलचा विचित्र जुगाड; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

बसमध्ये सीट मिळवण्यासाठी कपलचा विचित्र जुगाड; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती बसच्या सर्वात शेवटच्या सीटजवळ उभा आहे आणि तो एका महिलेला बसमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 फेब्रुवारी : देशात टॅलेन्टेड लोकांची कमी नाही. काही लोकांमध्ये तर टॅलेंट इतकं जास्त असतं की पाहणारे लोकही तोंडात बोटं घालतात. विशेषतः अनेकजण निरनिराळे जुगाड करण्यात एक्सपर्ट असतात. तुम्हीही इंटरनेटवर सक्रीय असाल तर असे अनेक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ हसवणारे तर काही हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू आलं तर काहींनी चिंता व्यक्त केली. चिमुकली रस्ता ओलांडत असतानाच वेगात आली कार अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आपल्या सर्वांना माहिती आहे, की बसमध्ये सीट (Bus Seat) मिळवण्यासाठी आपण भारतीय किती प्रयत्न करतो. कदाचित याच कारणामुळे बसमध्ये चढताच आपण आपली सीट पकडून ठेवतो किंवा तिथे आपलं काहीतरी सामान ठेवून ती रिझर्व करतो. सध्या सीट मिळवण्याासाठी एका कपलने केलेल्या अशाच अजब जुगाडाचा व्हिडिओ (Jugaad Video of Couple) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती बसच्या सर्वात शेवटच्या सीटजवळ उभा आहे आणि तो एका महिलेला बसमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्यक्ती खिडकीतून महिलेला हात देतो आणि महिला त्याचा हात पकडून खिडकीमधून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. बसमध्ये सीट मिळवण्यासाठी दोघांचा हा संघर्ष सुरू असतो आणि अखेर महिलेला सीट मिळतेच. मंडपात पाहुण्यांसमोर वधूचा अजब हट्ट; मग नवऱ्याने केलं असं काही… VIDEO Viral या मजेशीर व्हिडिओवर लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, जुगाड करून काहीच अशक्य नाही. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, सीटसाठी एवढी मेहनत आजपर्यंत कधीच नाही पाहिली. आणखी एकाने लिहिलं, जुगाडाची पद्धत अतिशय जोखिमेची आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला असून एका दिवसातच लाखो लोकांनी पाहिला आहे, तर 7 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात