Home /News /viral /

जेव्हा 2 क्रूर शिकारी मगर आणि शार्क आले आमने-सामने; पाहा पुढे काय घडलं, VIDEO

जेव्हा 2 क्रूर शिकारी मगर आणि शार्क आले आमने-सामने; पाहा पुढे काय घडलं, VIDEO

शार्क आणि मगर हे दोन्हीही अतिशय क्रूर शिकारी म्हणून ओळखले जातात. अशात हे दोन्ही शिकारी एकमेकांसमोर आल्यावर काय होईल?

  नवी दिल्ली 04 जानेवारी : मगर ही एक अशी शिकारी आहे, जिच्या जबड्यात अगदी मोठा प्राणीही फसला तरी त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. या जीवाचा जबडा इतका शक्तीशाली असतो की तो तावडीत सापडलेल्या प्राण्याची चिरफाड करतो. मात्र जर पाण्यातील जगाबद्दल बोलायचं झालं तर पाण्यात मगरीशिवायही अनेक शक्तीशाली जीव आहेत. यातीलच एक आहे शार्क. अशात शार्क आणि मगर (Shark and Crocodile Video) हे दोन्ही एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल? सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Video Viral on Social Media) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. OMG! हिंस्त्र चित्त्याला KISS करू लागली तरुणी; पाहा पुढे काय घडलं,Shocking Video शार्क आणि मगर हे दोन्हीही अतिशय क्रूर शिकारी म्हणून ओळखले जातात. अशात हे दोन्ही शिकारी एकमेकांसमोर आल्यावर काय होईल? हेच दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसतं की शार्क आणि मगर एकमेकांच्या एकदम जवळ आले आहेत.
  व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्रात एक रिकामी नाव दोरीने सांधलेली आहे. यादरम्यान मगर तिथे येते, तर काहीच वेळात वेगात एक शार्कही तिथे आल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य पाहून तुम्हालाही वाटेल की या दोन्ही क्रूऱ शिकाऱ्यांमध्ये आता काहीतरी घडणार आहे. मात्र असंच काहीच होत नाही आणि हे दोन्ही जीव शांततेत तिथून निघून जातात. VIDEO: अजगराच्या पाठीवर बसून बेडकाची ऐटीत सवारी; थाट पाहून घालाल तोंडात बोटं हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर roamtheocean नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, दोन शार्क आणि एक मगर अतिशय शांततेत एकमेकांजवळून जाताना. दोन दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ 65 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crocodile, Shocking video viral

  पुढील बातम्या