नवी दिल्ली 04 जानेवारी : जंगलातील भयानक प्राण्यांमध्ये चित्त्याचीही गणना होते. एखाद्या प्राण्याचा चित्त्यासोबत सामना झाला तर त्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. कारण चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. याच कारणामुळे हा प्राणी डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत शिकार करतो. मात्र सध्या एका चित्त्याचा आणि तरुणीचा वेगळाच व्हिडिओ (Cheetah Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. कारण यात एक करुणी चक्क चित्त्याला किस (Girl Kisses Cheetah) करताना दिसते. अवघ्या 14 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अस्वलाची शिकार करायला गेला वाघ; विचारही केला नसेल असा झाला शेवट; पाहा VIDEO
सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ सतत व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. यात एक तरुणी चक्क चित्त्याला मिठी मारून किस करताना दिसते. विशेष बाब म्हणजे यादरम्यान चित्ताही तिच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर earthfocus नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 21 डिसेंबरला शेअर झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 4 लाख 62 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. तर हा व्हिडिओ पाहून नेटकरीही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
तिच्यासाठी कायपण! GF साठी BF ने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला
एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, की हा सर्वात क्रूर शिकाऱ्यांमधील एक असतो आणि ही तरुणी एक नाही तर दोन चित्त्यांसोबत बसली आहे. दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिलं, या हिंस्त्र प्राण्याला इतकं शांत बसलेलं पाहून मी हैराण झालो. कारण पापणी मिटण्याच्या आतच हा कोणालाही संपवू शकतो. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, या प्राण्यांना त्यांच्या जगातच जगू द्यायला हवं. जंगली प्राणी माणसांचे मित्र बनू शकत नाहीत.