मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Video : शेजारच्यांची भांडणं ऐकून कुत्र्याची वाढली क्युरॉसिटी, सरळ उठला आणि...

Video : शेजारच्यांची भांडणं ऐकून कुत्र्याची वाढली क्युरॉसिटी, सरळ उठला आणि...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई १६ नोव्हेंबर : आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा भांडणं झाल्याचं तुम्ही पाहिली असतील. ही भांडणं आपल्या कामाच्या ठिकाणी, शेजारी, कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर झाली असल्याची पाहायला मिळतात आणि भांडणं पाहायला कोणाला आवडत नाही. कुठे ही भांडणं झाली तरी ती सोडवण्यापेक्षा अनेक लोक घोळका करुन पाहात बसताता. भांडणं पाहाणं माणसांना आवडतं आणि तो बऱ्याच लोकांचा गुणधर्म आहे.

असे देखील अनेक लोक आहेत, जे याकडे मनोरंजक गोष्ट म्हणून देखील पाहातात. पण तुम्हाला काय वाटतं भांडणं ऐकण्याची क्युरिओसीटी फक्त माणसातच असते? जर तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्ही फारच चुकीचा विचार करताय...

हे ही पाहा : इंटरनेटवरील सर्वात सुंदर Video, कुत्र्याचं वागणं पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल

हो कारण माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील भांडणं पाहायला आवडतात आणि या संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

या व्हिडीओमध्ये कुत्रा एका भिंतीला पाय लावून उभा असलेला दिसत आहे आणि तो काहीतरी ऐकण्याचा किंवा पाहाण्याचा प्रयत्न करत आहे, असंच दिसत आहे. आधी तुमच्या लक्षात येणार नाही की हा कुत्रा नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहे. पण खरंतर हा कुत्रा भांडणं ऐकण्याचा प्रयत्न करत आहे.

तुम्ही हा व्हिडीओ आवाजासकट ऐकलात, तर तुमच्या लक्षात येईल की, बॅकग्राउंडला भांडणं सुरु आहेत आणि कुत्रा तेच पाहाण्याचा प्रयत्न करत आहे.

बाजूच्या घरात सुरु असलेली भांडणं ऐकण्याचा मोह कुत्र्याला झाला आणि तो ते ऐकण्यासाठी कसरत देखील करु लागला. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट आणि लाईक केलं आहे.

First published:

Tags: Dog, Shocking video viral, Top trending, Videos viral, Viral